Akurdi : आई – वडिलांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी योगदान द्यावे – भाईजान काझी

एमपीसी  न्यूज – आई-वडिलांनी तुमच्यासाठी केलेले कष्ट व तुमच्या भविष्याबद्दल त्यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरण्यासाठी विद्यार्थ्यांनी शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करावा, असे मार्गदर्शन पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टचे विश्वस्त भाईजान काझी यांनी केले. 

आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या पिंपरी-चिंचवड तंत्र शिक्षण महाविद्यालयाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा इंडक्शन प्रोग्राम प्रसंगी भाईजान काझी बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्‌मा भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार एस. डी. गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्या डॉ. व्ही. एस. बॅकोड, पराग जोशी, ए. जी. समुद्र, डॉ. एम. एस. पवार आदी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना भाईजान काझी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोबाईल इंटरनेट व तत्सम साधनांचा उपयोग योग्य कारणासाठीच करावा. तसेच सोशल मिडियाचा अति व गैरवापर करू नये. इंटरनेट व सोशल मिडियापासून दूर राहिले पाहिजे. गाडी चालविताना स्टंट, कर्णकर्कश आवाज, अतिवेग करू नये. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.

_MPC_DIR_MPU_II

अभ्यासाबरोबरच वेळेच्या उपलब्धतेप्रमाणे व्यायाम व मैदानी खेळ खेळावेत. विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्यासाठी शिस्त आणि मेहनत  सातत्याने अंगीकारले पाहिजे. मराठी माध्यमातून आलेल्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचा न्यूनगंड बाळगू नये. इंग्रजीची भिती किंवा न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. यापूर्वीच्या अनेक वर्षामध्ये मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांचे यश संस्थेत सततच पहावयास मिळाले आहे, असा विश्वास विद्यार्थी व पालकांना काझी यांनी दिला.

पिंपरी-चिंचवड तंत्र शिक्षण महाविद्यालयाला नुकतेच नॅकचे मानांकन प्राप्त झाले असल्याची माहिती प्राचार्या बॅकोड यांनी दिली.

उपप्राचार्य बी. व्ही. माने यांनी आय-स्किम संदर्भात माहिती दिली. एस. जी. अपरंजी यांनी आभार मानले. सुत्रसंचालन माजी विद्यार्थीनी आदिती शहा यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.