Pune News : ‘ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक’, अभिनेत्री केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट

एमपीसी न्यूज : मराठी अभिनेत्री केतकी चितळे सोशल मीडियावर वादग्रस्त लिखाणासाठी ओळखली जाते. ही अभिनेत्री आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विषयी तिने आपल्या सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीही अनेकदा वादग्रस्त पोस्ट मुळे केतकी चितळे चर्चेत आली होती. 

केतकी चितळे हिने शरद पवारांच्या आजाराचा संदर्भ घेऊन टीका केली होती. आता तिने एक आपल्या सोशल मीडियावर शरद पवारांचा अपमान करणारी पोस्ट केली आहे. यावरून तिला ट्रोल देखील केले जात आहे. वकील नितीन भावे यांनी लिहिलेली कविता केतकी हिने फेसबुक वर शेअर केले आहे. यावरूनच तिच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर  मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन  फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll

याला ओरबाड त्याला ओरबाड l  तू तर लबाडांचा लबाड ll

-Advocate Nitin Bhave 

हीच ती कविता आहे. हजारो लोकांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.