Pune : उड्डाणपुलाच्या निधी वर्गीकरणावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये वादावादी

एमपीसी न्यूज – सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासाठी तरतूद केलेल्या आठ कोटी रुपयांच्या वर्गीकरणावरून महापालिकेच्या सर्वसाधारण समेत सत्ताधारी नगरसेवक व विरोधी नगरसेवक यांच्यात जोरदार वादावादी झाली. विरोधी पक्षाचे वर्गीकरणाचे प्रस्ताव फेटाळता आणि सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांचे प्रस्ताव कसे मान्य करता? अशा विचारणा करीत सर्वच विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी या प्रस्तावावर आक्षेप घेतला.

आरोप-प्रत्यारोप व्यक्तिगत टीकांनंतर निधी वर्गीकरणचा प्रस्ताव उप-सूचनेसह मंजूर करण्यात आला. सिंहगड रस्त्यावरील उडुपपुलाच्या आठ कोटी निधीच्या वर्गीकरणाचा प्रस्ताव नगरसेविका मंजुषा नागपुरे, श्रीकांत जगताप, प्रसन्न जगताप यांनी दिला होता. हा निधी शहरासाठी आणि प्रकल्पासाठी असून, तो एका प्रभागासाठी देता येणार नाही, असे म्हणत राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्षेप घेत. सर्वसाधारण अभेत गोंधळ घातल्याने महापौर मुक्ता टिळक यांनी वर्गीकरणामागील भूमिका मांडण्याच्या सूचना मंजूषा नागपुरे यांना केल्या. भूमिका मांडताना यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी निधी इतर कामांना वळविल्याचे दाखले दिले. त्यांच्या आरोपांना काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी आक्षेप घेतल्यानंतर महिलांचा आवाज दाबण्याचा आरोप नागपुरे यांनी केला. या आरोपावरून पुन्हा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.