Chinchwad : गर्भपात करण्यास नकार दिल्यावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – पती आणि सासरचे मंडळी यांच्या सांगण्यानुसार गर्भपात करण्यास विवाहितेने नकार दिल्यावरून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. 26 ऑगस्ट 2016 ते 5 फेब्रुवारी 2018 या कालावधीत बिजलीनगर चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी पीडित विवाहितेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती सतीश मारुती येवले, सासू सुलोचना मारुती येवले (रा. बिजलीनगर, चिंचवड), नणंद सीमा विनोद भूरूख (रा. भीमाशंकर चौक, मुकाई), नणंद नीता सुनील चव्हाण (रा. सायली कॉम्प्लेक्स, चिंतामण नगर, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश याचे विवाहबाह्य संबंध आहेत. ही बाब पीडित महिलेने सासरच्या मंडळींना सांगितली. यावरून त्यांनी सतीश याला जाब विचारण्याऐवजी सुनेलाच छळण्यास सुरुवात केली. आम्हाला बाळ नको असताना तू आमच्या सांगण्यानुसार गर्भपात का केला नाही. असे म्हणून सतीश याने पिडीतेला शिवीगाळ व मारहाण केली होती. तसेच आमच्या घराची बदनामी करते म्हणून सासू व नणंदांनी पिडीतेचा मानसिक छळ केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.