Pune New: OLX वर कुलर विक्रीची जाहिरात देणे पडले महागात, तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज : घरातील जुन्या कुलर ची ओएलएक्सवर विक्री करण्याचा प्रयत्न करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. सायबर चोरट्यांनी या व्यक्तीला तब्बल तीन लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी परेश माथूर (वय 44) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कोंढवा परिसरातील महंमदवाडी भागात फिर्यादीला राहतात. त्यांच्याकडे असलेले जुनी कुलर विक्री करण्यासाठी त्यांनी ओएलएक्स वर जाहिरात टाकली होती. ही जाहिरात पाहून आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधला. तसेच हा कुलर खरेदी करणार असल्याचे सांगत त्यांच्याशी संपर्क वाढवत विश्वास संपादन केला.

दरम्यान व्यवहार ठरल्यानंतर आरोपीने त्यांच्याकडे पैशाची विचारपूस केली. तसेच तुम्हाला पैसे पाठवल्यानंतर काही पैसे परत रिफंड होतील असे सांगत फिर्यादीला दोन लाख 80 हजार रुपये एका बँक खात्यात ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. त्यानंतरही त्यांच्याकडे अधिक पैशाची मागणी केली जात होती. दरम्यान या सर्व प्रकारानंतर फिर्यादीला आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.