moshi : कंपनीतून सव्वाचार लाखांचे कॉपर चोरीला

एमपीसी न्यूज – कंपनीचे शटर व पत्रा उचकटून चोरट्यांनी सव्वाचार लाखांचे कॉपर चोरून नेले. ही घटना 14 ते 16 ऑगस्ट या कालावधीत भोसरी, एमआयडीसी येथे घडली.

याप्रकरणी मयुरेश माणिक सुतार (वय 31, रा. नागेश्वर कॉलनी, मोशी) यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची भोसरी, एमआयडीसी येथे मोंगा स्टिफिल्ड प्रा. लि. नावाने कंपनी आहे. कंपनी 14 ते 16 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत होती. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कंपनीचे शटर व पत्रा उचकटून आत प्रवेश केला. कंपनीतील 4 लाख 31 हजार 755 रूपयांचे कॉपर चोरून नेले. फौजदार पंचमुख तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like