Pune : घरफोडी व वाहनचोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराला अटक

एमपीसी न्यूज – भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याअंतर्गत पेट्रोलिंग करीत असताना घरफोडी व वाहचोरीतील एका सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले असून एक स्विफ्ट डिझायर, एक सेन्ट्रो कारसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जितेंद्रकुमार चंपालाल जैन (वय 34, पाली, राजस्थान), असे या चोरट्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोलिंग करताना पोलिसांना मुंबई बँगलोर हायवेवर भूमकर चौकाकडून आंबेगाव बुद्रुककडे जाणा-या सर्व्हिस रोडवर एक पांढ-या रंगाची स्विफ्ट थांबली असून त्यातील इसम गाडीची नंबर प्लेट बदलत आहे. तसेच त्याने दोन महिन्यापूर्वी दत्तनगर भागात चोरी केली आहे, अशी माहिती मिळाली होती.

या माहितीनुसार, सर्व्हिस रोडवर वॉच ठेवला असता एक व्यक्ती तिथे स्विफ्ट गाडीची नंबर प्लेट बदलत असल्याचे दिसले. त्याला ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता आरोपीने जितेंद्रकुमार चंम्पालाल जैन असे सांगितले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांसह दत्तनगर भागात चोरी केल्याचे कबूल केले. तसेच 15 दिवसापूर्वी जुन्नर परिसरातून एक सेन्ट्रो कार चोरी करून त्यातून न-हे परिसरातील ब्रॅण्डेड कपड्यांच्या शोरूममधून एक लाख 12 हजार रुपयांचे कपडे चोरी केले.

आरोपीकडून एक सॅन्ट्रो कार, एक स्विफ्ट डिझायर, आणि सव्वा लाखांचे ब्रॅण्डेड कपडे असा एकूण सहा लाख 62 हजार चा माल जप्त केले आहेत. आरोपीकडून सिंहगड रोड पोलीस ठाणे, घरफोडी मंचर पोलीस ठाण्याकडील 1 वाहनचोरी असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.