Pune News : पुणे विमानतळावर आजपासून प्रवाशांचं थर्मल स्क्रीनिंग सुरु होणार

एमपीसी न्यूज : कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. चीन आणि देशाच्या काही भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सगळीकडे खबरदारी घेतली जात आहे. याच सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुणे महापालिकादेखील सज्ज झाली आहे. (Pune News) खबरदारीचा भाग म्हणून पुणे विमानतळावर बाहेर देशातून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग सुरु करत आहे, असं PMC अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी याबाबत माहिती दिली.

खबरदारीच्या उपायांचा भाग म्हणून पीएमसीने लोकांना कोविडच्या नियमांचं पालन करण्याचे आवाहन केलं आहे. परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असेही ते म्हणाले. पुण्यात सध्या 44 सक्रिय कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. चाचणीसाठी आरटीपीसीआर केंद्रे पुन्हा सुरु केली जातील आणि वॉर्ड कार्यालयांच्या माध्यमातून गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

NEBC Project : एनईबीसी कमर्शिअल हबमध्ये मिळवा ऑफिसच्या दरात दुकान ते ही 10 ग्रॅम सोन्यासह

विमानतळ संचालक संतोष ढोके यांनीही महानगरपालिकेचे अधिकारी थर्मल स्क्रीनिंग करणार असल्याची माहिती दिली आहे. पुणे विमानतळावर दुबई, सिंगापूर आणि बँकॉकसाठी प्रत्येकी एकासह तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे आहेत. सिंगापूर आणि बँकॉकची उड्डाणे गेल्या महिन्यात जोडण्यात आली होती, (Pune News) तर दुबईची फ्लाईट बऱ्याच महिन्यांपासून सुरु आहे. आयटी हब असल्याने शहरात अनेक कंपन्या आहेत ज्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहेत. याशिवाय अनेक परदेशी विद्यार्थीही पुण्यात शिक्षण घेतात. त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

गुरुवारपासून विमानतळावर अधिकार्‍यांची एक टीम तैनात केली आहे आणि आंतरराष्ट्रीय विमानाने येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. शिवाय, प्रवाशांच्या आरटी पीसीआर चाचण्या करण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात येणार आहे असं महानगरपालिकेकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.