New Delhi: भारतात 873 कोरोना पॉझिटीव्ह तर आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 873 झाली आहे. आतापर्यंत एकूण 79 रुग्ण उपचारांमुळे कोरोनामुक्त झाले आहेत. तर 19 कोरोनाबाधित रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. भारतात अजूनही 775 सक्रिय कोरोनाबाधित आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने ही अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. युरोपीयन देशांच्या तुलनेत भारतातील कोरोनाबाधितांची व मृतांची संख्या कमी दिसत असली तर भारतीयांना इतर देशांकडून धडा शिकणे गरजेचे आहे. वेळीच सावध होऊन स्वतःची व देशबांधवांची काळजी घेतली पाहिजे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.