India Corona Update : कोरोना विस्फोट ! 24 तासांत 1,84,372 नवे रुग्ण ; 1,027 मृत्यू 

एमपीसी न्यूज – देशात कोरोना रुग्णवाढ दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात तब्बल 1 लाख 84 हजार 372 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 1 हजार 027 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण रुग्णांची संख्या 1 कोटी 38 लाख 73 हजार 036 एवढी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 कोटी 23 लाख 36 हजार 039 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 82 हजार 339 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 88.91 टक्के एवढा झाला आहे.

_MPC_DIR_MPU_II
मागील 24 तासांत 1 हजार 27 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 72 हजार 085 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.24 टक्के एवढा आहे‌. देशात आजवर 26 कोटी 06 लाख 18 हजार 866 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 14 लाख 11 हजार 758 चाचण्या मंगळवारी (दि.13) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 11 कोटी 11 लाख 79 हजार 578 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.
दरम्यान, वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आज (बुधवार, दि.14) रात्री आठपासून संचारबंदी (कलम 144) लागू करण्यात आली आहे. आज रात्री 8 पासून पुढचे पंधरा दिवस कुणालाही कारण नसताना घरा बाहेर पडता येणार नाही. दरम्यान, या कालावधीत कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.