India Corona Update : कोरोना विस्फोट ! 24 तासांत वाढले तब्बल 81 हजार 466 रुग्ण 

एमपीसी न्यूज – देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 81 हजार 466 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. 2021 मधील ही उच्चांकी रुग्ण वाढ आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 23 लाख 03 हजार 131 एवढी झाली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 कोटी 15 लाख 25 हजार 039 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या 6 लाख 14 हजार 696 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 93.67 टक्के एवढा झाला आहे.

मागील 24 तासांत 469 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 63 हजार 396 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा आहे‌.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 24 कोटी 59 लाख 12 हजार 587 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 11 लाख 13 हजार 966 चाचण्या गुरुवारी (दि.01) करण्यात आल्या आहेत.

लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 6 कोटी 87 लाख 89 हजार 168 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. एक एप्रिल रोजी देशात तब्बल 36 लाख 71 हजार 242 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.