Pune Corona Update : पुणे जिल्ह्यातील कोरोना काळातील रुग्णवाढ बुधवारी उच्चांकी पातळीवर

एमपीसी न्यूज – कोरोना काळात होणारी पुणे जिल्ह्याची रुग्णवाढ बुधवारी (दि. 31) उच्चांकी पातळीवर पोहोचली. बुधवारी जिल्ह्यात 8 हजार 605 नवीन रुग्णांची नोंद झाली असून  56 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात बुधवारी चार हजार 458 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची संख्या दोन लाख 69 हजार 343 एवढी झाली आहे. बुधवारी तीन हजार 374 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत दोन लाख 30 हजार 183 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे शहरातील 32, शहराबाहेरील 11 तर पिंपरी चिंचवड मधील 13 रुग्णांचा बुधवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत नऊ हजार 974 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरात दोन हजार 288 तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एक हजार 859 रुग्ण आढळले आहेत.

रुग्णवाढीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहेत. रोजची वाढणारी आकडेवारी चिंतेचा विषय बनली आहे. लसीकरण सुरू असताना देखील ही रुग्णवाढ होत आहे. पालिका प्रशासनाने खाजगी रुग्णालयातील 80 टक्के बेडस अधिग्रहित केले आहेत. त्याचबरोबर पुणे महापालिका जम्बो सीसीसी सेंटर सुरू करण्याच्या तयारीत आहे. कमी होणारा कोरोना पुन्हा एकदा पाय पसरू लागल्याने अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.