Corona Free Country : ‘हा’ देश झाला कोरोनामुक्त; गेल्या 17 दिवसात आढळला नाही एकही नवा रुग्ण

Corona Free Country: 'This' country became Corona Free; No new patients were found in the last 17 days

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू सर्व जगभर थैमान घालत असताना एका देशाने मात्र कोरोनावर विजय मिळवला आहे. 

न्यूझीलंड या देशाने कोरोना या महामारीवर यशस्वी विजय मिळवला असून न्यूझीलंडमध्ये गेल्या 17 दिवसांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आला नाही. तसेच गेल्या 12 दिवसांपासून दवाखान्यात एकही रुग्ण नाही. या देशात 40 दिवसांपूर्वी समूह संसर्गाचा एक रुग्ण आढळला होता.

गेल्या 17 दिवसात जवळपास 40 हजार कोरोना टेस्ट करण्यात आल्या मात्र, त्यातील एक सुद्धा  पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही. न्यूझीलंड देश कोरोनामुक्त झाल्याचं पंतप्रधान जसिंडा अर्डेन यांनी जाहीर केलं आहे. 50 लाख लोकसंख्येच्या या देशात आता एकही कोरोना रुग्ण नाही.

जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार न्यूझीलंडने सादर केलेला कोरोनाबाधितांचा अधिकृत आकडा 1154 आहे. त्यातल्या 22 लोकांनी आपला जीव गमावला आणि बाकीच्या सर्वांनी कोरोनावर मात केली.

पंतप्रधान जेसिंडा अर्डेन यांनी याबाबत आनंद व्यक्त करताना असे सांगितले की, ज्यावेळी ही बातमी कळली त्यावेळी मी आनंदाने नाचले आणि मला नाचताना पाहून मुलीलाही आश्चर्य वाटलं मात्र तिला कारण सांगितल्यावर ती सुद्धा आमच्या नाचण्यात सामील झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.