Corona India Update: एका दिवसात 6,088 नवे रुग्ण, 3234 रुग्णांना डिस्चार्ज, 148 मृत्यू, सक्रिय रुग्णांची संख्या 66,330 वर!

Corona India Update: 6,088 new patients in one day, 3234 patients discharged, 148 deaths, number of active patients at 66,330!

एमपीसी न्यूज – भारत काल (गुरुवारी) एका दिवसात कोरोनाचा संसर्ग झालेले नवीन 6,088 रुग्ण आढळून आले. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. कोरोनावर मात करणाऱ्या 3,234 रुग्णांना काल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर 148 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. कालअखेर देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 66 हजार 330 वर पोहचली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार काल नवीन 6,088 नवीन रुग्णांची भर पडल्यामुळे आतापर्यंत आढळलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 18 हजार 447 झाली आहे. त्यापैकी 48 हजार 534 रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे. कोरोनामुक्तांची टक्केवारी 40.97 म्हणजेच जवळजवळ 41 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

काल दिवसभरात कोरोनाबाधित मृतांची संख्या 148 ने वाढली. त्यामुळे देशात आतापर्यंतच्या कोरोना बळींचा एकूण आकडा 3 हजार 583 वर जाऊन धडकला आहे. एकूण कोरोना केसेस पैकी निकाली निघालेल्या केसेसमध्ये कोरोनामुक्तांचे प्रमाण 93.12 टक्के तर मृतांचे प्रमाण 6.88 टक्के असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांपैकी कोरोनामुक्त आणि मृतांची संख्या वगळून आता देशभरातील विविध रुग्णालयांमध्ये 66 हजार 330 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात झालेली राज्ये (कंसात मृतांचे आकडे)

  • महाराष्ट्र – 41 हजार 642 (1454)
  • तमिळनाडू – 13 हजार 967 (94)
  • गुजरात – 12 हजार 905 (773)
  • दिल्ली – 11 हजार 659 (194)
  • राजस्थान – 6 हजार 227 (151)
  • मध्य प्रदेश – 5 हजार 981 (270)
  • उत्तर प्रदेश – 5 हजार 515 (138)
  • पश्चिम बंगाल – 3 हजार 197 (259)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.