Pimpri : ‘कोरोना’ येतोय!, दक्षता घ्या, गर्दीच्या ठिकाणी जावू नका, महापालिकेचे आवाहन  

महापालिका सज्ज, जनजागृतीचे फलक  

एमपीसी न्यूज – चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या ‘कोरोना’ व्हायरसने जगभरात भीतीचे थैमान घातले आहे. भारतात देखील ‘कोरोना व्हायरस’ हळूहळू पसरत असून महाराष्ट्रात देखील शिरकाव करु लागला आहे. कोरोनापासून दक्षता घेण्यासाठी पिंपरी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे. कोरोना व्हायरस’च्या दक्षेतसाठी ‘वायसीएमएच’मध्ये अतिदक्षता कक्ष सुरु करण्यात आला आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी. विनाकारण एकत्र यायचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणची गर्दी टाळावी. वारंवार हात स्वच्छ ठेवावेत. मास्कचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.

दिल्ली, तेलंगणामध्ये कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. तर, नाशिकमध्ये  संशयीत आढळला आहे. त्यामुळे कोरोना महाराष्ट्रात देखील शिरकाव करत आहे. त्यामुळे दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे.  पिंपरी-चिंचवड शहरात असंख्य नागरिक बाहेरून दाखल होत असतात. त्यापार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये नवीन कोरोना विषाणू रुग्णासाठी स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आला आहे.

अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे म्हणाले, कोरोना व्हायरसबाबत नागरिकांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी, याबाबत जागृती करण्यासाठी चौकांमध्ये फलक लावण्यात आले आहेत. वायसीएममध्ये एक वॉर्ड राखीव ठेवण्यात आला आहे. डॉक्टरांना सातत्याने सूचना दिल्या जात आहेत. डॉक्टरांच्या बैठका घेतल्या जात आहेत. महापालिकेची संपूर्ण तयारी आहे. वायसीएममध्ये खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अचानक रुग्ण आला. तर, दाखल करुन घेऊ शकतो.

नागरिकांनी हाताची स्वच्छता ठेवावी. दिवसातून जास्तीत-जास्तवेळा हात धुवावा. विनाकारण गर्दी करु नये. गर्दीच्या ठिकाणी जावू नये. मास्कचा वापर करावा. आजारी असताना आराम करावा. सर्दी, ताप आल्यावर तत्काळ डॉक्टरांना दाखवावे. घरी आराम करावा. खासकरुन परदेशातून आलेल्या नागरिकांपासून दूर रहावे. सरकारने परदेशातील लोकांना त्याच देशात ठेवले आहे. भारतात कोरोनाचे प्रमाण कमी आहे. परंतु, भीती अधिक आहे. भीती अनाठायी आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये. कोरोना विषाणूबाबत राज्य सरकारने दिलेल्या सूचनांप्रमाणे आरोग्य विभागाचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारकडून येणा-या आदेशांची अंमलबजावणी केली जात आहे, असेही डॉ. साळवे यांनी सांगितले.

ही आहेत कोरोनाची लक्षणं!
दीर्घ काळ राहणारा खोकला, वारंवार सर्दी होणे, वारंवार ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अंग आणि डोकेदुखी, घसा दुखणे,

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.