Corona News : नव्या कोरोनाचा इफेक्ट; 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद

एमपीसी न्यूज – ब्रिटनमधून आलेल्या नागरिकांपैकी 20 जणांमध्ये ‘सार्स-सीओव्ही-2’ हा नविन स्वरुपातील विषाणू (नवीन म्युटंट व्हेरिएन्ट) आढळला आहे. यात यापूर्वी नोंदवलेल्या सहा जणांचा समावेश आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवेवरील बंदी 7 जानेवारीवरून 31 जानेवारी पर्यंत वाढविण्यात आली आहे. 31 जानेवारी पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर बंदी घालण्यात आली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने याबाबत प्रसिद्धी पत्रक दिले आहे.

विमानसेवा बंदी ट्विट

भारत सरकारने जीनोम सिक्वेंसींगसाठी 10 प्रयोगशाळांचा समावेश असलेल्या आयएनएसएसीओजी (इंडियन सार्स-सीओव्ही-2 जेनोमिक्स कन्सोर्टियम) ची स्थापना केली आहे.

त्यामध्ये एनआयबीएमजी कोलकाता, आयएलएस भुवनेश्वर, एनआयव्ही पुणे, सीसीएस पुणे, सीसीएमबी हैदराबाद, सीडीएफडी हैदराबाद, इंस्टेम बेंगलुरू, निमहंस बेंगलुरू, आयजीआयबी दिल्ली, एनसीडीसी दिल्ली या प्रयोगशाळांची समावेश आहे.

परिस्थिती काळजीपूर्वक हाताळली जात असून देखरेख, नियंत्रण, चाचणी वाढविण्यासाठी आणि आयएनएसएसीओजी प्रयोगशाळांमध्ये नमुने पाठविण्यासाठी राज्यांना नियमित सल्ला दिला जात असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

निम्महंस, बंगळुरूमध्ये तीन, सीसीएमबी, हैदराबादमध्ये दोन आणि एनआयव्ही, पुणे येथे एक अशा सहा रुग्णांना नव्या कोरोना विषाणूची लागण झाल्याचे यापूर्वी निदर्शनास आले होते. त्यानंतर त्यात आणखी 14 रुग्णांची वाढ झाली असून हा आकडा आता २० वर पोहोचला आहे.

मागील 33 दिवसांपासून दररोज नोंद होणा-या नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणा-या रुग्णांची संख्या अधिक आहे. मागील 24 तासांत, देशात 20 हजार 549 व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे आढळले. याच कालावधीत, सक्रीय रुग्णसंख्येत घट झाल्याची नोंद झाली असून 26 हजार 572 नवीन रुग्ण बरे झाले आहेत.

भारतातील एकूण बरे झालेल्यांची सख्या 98 लाख 34 हजार 141 झाली आहे. जागतिक पातळीवर हा आकडा सर्वाधिक आहे. बरे होणा-या रुग्णांचा दर 95.99 एवढा झाला आहे.

31 जानेवारी पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद

आंतरराष्ट्रीय विमानसेवेवरील बंदी 7 जानेवारीवरून पुढे नेत 31 जानेवारी पर्यंत वाढविण्यात आली आहे. 31 जानेवारी पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर बंदी घालण्यात आली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने याबाबत प्रसिद्धी पत्रक दिले आहे.

ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या बंदीमधून विशेष विमाने आणि मालवाहतूक करणा-या विमानांना वगळण्यात आले आहे.

ब्रिटनमध्ये नवा विषाणू आढळल्यानंतर भारत सरकारने ब्रिटनहून भारतात येणा-या आणि जाणा-या विमानांवर बंदी घातली. सुरुवातीला ही बंदी 7 जानेवारी पर्यंत घालण्यात आली होती. मात्र, आता त्यात वाढ करून संपूर्ण आंतरराष्ट्रीय विमानांवर 31 जानेवारी पर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.