India Corona Update : कोरोनाचा उद्रेक ! सलग दुसऱ्या दिवशी देशात दोन लाखांहून अधिक रुग्ण 

एमपीसी न्यूज – देशात कोरोना रुग्णवाढीचा उद्रेक झाला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी देशात दोन लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात तब्बल 2 लाख 17 हजार 353 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच आजही एक हजाराहून अधिक मृत्यू झाले असून गेल्या 24 तासांत 1 हजार 185 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण रुग्णांची संख्या 1 कोटी 42 लाख 91 हजार 917 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 25 लाख 47 हजार 866 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 1 लाख 18 हजार 302 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 87.79 टक्के एवढा झाला आहे.

मागील 24 तासांत 1 हजार 185 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 74 हजार 308 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.21 टक्के एवढा आहे‌.

देशात आजवर 26 कोटी 34 लाख 76 हजार 6250 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 14 लाख 73 हजार 210 चाचण्या गुरुवारी (दि.15) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 11 कोटी 72 लाख 23 हजार 509 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.