Pune: कोरोनाबाधित रुग्णाची कोव्हिड केअर सेंटरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

Pune: Corona patient commits suicide by hanging at kondhwa Covid Care Center गुंडाप्पा शेवरे आणि त्यांचा मुलगा कोरोना बाधीत आढळल्याने 4 जुलैपासून त्यांना कोंढव्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट मधील कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.

एमपीसी न्यूज- कोंढवा येथील एका कोव्हिड केअर सेंटरमध्ये एका 60 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाने गळफास घेउन आत्महत्या केली आहे. सोमवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये हा प्रकार घडला. गुंडाप्पा शेवरे (वय 60) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंडाप्पा शेवरे आणि त्यांचा मुलगा कोरोना बाधीत आढळल्याने 4 जुलैपासून त्यांना कोंढव्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट मधील कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. या दोघांना ज्या खोलीत ठेवण्यात आले होते. त्या खोलीत आणखी दोघे उपचार घेत होते.

दरम्यान, सकाळी शेवरे यांचा मुलगा आणि अन्य दोघेजण नाश्ता करण्यासाठी बाहेर पडले. नाश्ता करून ते परत आले असता त्यांना गुंडाप्पा शेवरे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like