MUMBAI : मुंबईसह रत्नागिरीत कोरोनाचा रुग्ण आढळला; राज्यात एकूण ४५ रुग्ण

एमपीसी न्यूज – आज दिवसभरात पिंपरी चिंचवड आणि पुणे येथे प्रत्येकी एक, तर मुंबई आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यभरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ४५ इतकी झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे -पिंपरीचिंचवड शहरात आज (बुधवारी) कोरोनाचे दोन नवे रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आढळले. यातील एकजण फ्रान्समधून तर दुसरा रुग्ण फिलिपिन्स येथून प्रवास करुन शहरात आला आहे. तर रत्नागिरीत आढळलेला रुग्ण दुबईहून आला आहे. मुंबईत आढळलेल्या रुग्णाबाबत अद्याप माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

राज्य सरकार कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करीत असले तरी  राज्याच्या विविध भागात दररोज नव्या कोरोनाबाधित रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.