World Update: जगात कोरोनाबाधितांची संख्या 38 लाखांवर, कोरोना बळींचा आकडा 2,64,837 वर

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 38 लाख 19 हजार 843 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 2 लाख 64 हजार 837 (6.94 टक्के) इतकी झाली आहे. आतापर्यंत 13 लाख 01 हजार 736 (34.06 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 22 लाख 55 हजार 209 इतके सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 22 लाख 06 हजार 998 म्हणजेच तब्बल 98 टक्के रुग्णांचा आजार हा सौम्य प्रकारचा असून 48 हजार 211 म्हणजेच केवळ 2 टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. नवीन कोरोनाबाधित रुग्णांबरोबरच मृतांच्या संख्येतही लक्षणीय वाढ दिसत आहे.

मागील सहा दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

1 मे – नवे रुग्ण 94 हजार 552  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 624

2 मे – नवे रुग्ण 83 हजार 255  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 215

3 मे – नवे रुग्ण 81 हजार 725  दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 480

4 मे – नवे रुग्ण 83 हजार 255  दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 096

5 मे – नवे रुग्ण 85 हजार 991  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 258

6 मे – नवे रुग्ण 95 हजार 325  दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 811

अमेरिकेत काल (बुधवारी) एका दिवसांत 2,528 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना मृतांचा आकडा जवळजवळ 75 हजार म्हणजेच 74,799 झाला आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा 12 लाख 63 हजार 092 वर पोहचला आहे. ब्राझीलमध्ये काल 667 तर इंग्लंडमध्ये 649 कोरोनोबाधित मृत्यू नोंदविले गेले. इटलीत 369, बेल्जियममध्ये काल दिवसभरात 323, जर्मनी 282, फ्रान्स 278, स्पेन 244 तर मेक्सिकोमध्ये कोरोनाचे 236 बळी गेले आहेत. इंग्लंडने कोरोनाबाधितांचा दोघांचा तर मृतांचा 30 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. इराणमधील कोरोनाबाधितांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली आहे. एक लाख पेक्षा अधिक कोरोनाबाधितांची संख्या असलेला इराण हा दहावा देश ठरला आहे तर भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 50 हजारांच्या पुढे गेली आहे.

जागतिक क्रमवारीत आता भारत 14 व्या स्थानावर

कोरोनाबाधितांच्या जागतिक क्रमवारीत काल पेरू, भारत, सौदी अरेबिया या तीन देशांना वरचे स्थान प्राप्त झाले आहे. पेरू 14 व्या स्थानावरून 13 व्या स्थानावर पोहचला, भारत 15 व्या स्थानावरून 14 व्या स्थानावर गेला आहे तर बेल्जियन 13 व्या स्थानावरून 15 व्या स्थानावर गेला आहे. सौदी अरेबिया 19 व्या स्थानावरून 17 व्या स्थानावर गेला आहे. इक्वाडोर 18 व्या तर स्वत्झर्लंड 19 व्या स्थानावर आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 12,63,092 (+25,459), मृत 74,799 (+2,528)
  2. स्पेन – कोरोनाबाधित 2,53,682 (+3,121), मृत 25,857 (+244)
  3. इटली – कोरोनाबाधित 2,14,457 (+1,444), मृत 29,684 (+369)
  4. यू. के. – कोरोनाबाधित 2,01,101 (+6,111), मृत 30,076 (+649)
  5. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,74,191 (+3,640), मृत 25,809 (+278)
  6. जर्मनी – कोरोनाबाधित 1,68,162 (+1,155), मृत 7,275 (+282)
  7. रशिया – कोरोनाबाधित 1,65,929 (+10,559), मृत 1,537 (+86)
  8. टर्की – कोरोनाबाधित 1,31,744 (+2,253), मृत 3,584 (+64)
  9. ब्राझील – कोरोनाबाधित 1,26,611 (+11,896), मृत 8,588 (+667)
  10. इराण – कोरोनाबाधित 1,01,650 (+1,680), मृत 6,418 (+78)
  11. चीन – कोरोनाबाधित 82,883 (+2), मृत 4,633 (+0)
  12. कॅनडा –  कोरोनाबाधित 63,496 (+1,450), मृत 4,232 (+189)
  13. पेरू –  कोरोनाबाधित 54,817 (+3,628) , मृत 1,533 (+89) 
  14. भारत – कोरोनाबाधित 52,987 (+3,587) , मृत 1,785 (+92)
  15. बेल्जियम – कोरोनाबाधित 50,781 (+272), मृत 8,339 (+323)
  16. नेदरलँड – कोरोनाबाधित 41,319 (+232), मृत 5,204 (+36)
  17. सौदी अरेबियाकोरोनाबाधित 31,938 (+1,687) , मृत 209 (+9) 
  18. इक्वाडोर – कोरोनाबाधित 31,881 (+0), मृत 1,618 (+49)
  19. स्वित्झर्लंड – कोरोनाबाधित 30,060 (+51), मृत 1,805 (+10)
  20. पोर्तुगाल – कोरोनाबाधित 26,182 (+480), मृत 1,089 (+15)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.