Dapodi News : महापालिकेतर्फे कुष्ठरोग बाधितांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण

एमपीसी न्यूज – दापोडी येथील आनंदवन कुष्ठरोग वसाहतीमध्ये आज (शनिवारी) कुष्ठरोग बाधितांचे कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. नागरिकांनी कोरोना विषयक नियमांचे पालन करून केलेले सहकार्य आणि एकजुटीने केलेल्या मुकाबल्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणू शकलो.  संभाव्य तिस-या लाटेला परतवून लावण्यासाठी असेच सहकार्य सर्वांनी कायम ठेवावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी केले.

या कार्यक्रमास नगरसेविका स्वाती काटे, नगरसेवक राजू बनसोडे, स्वीकृत सदस्य अनिकेत काटे, माजी नगरसेवक राजेंद्र काटे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे,  सांगवी रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, डॉ. वर्षा डांगे, महाराष्ट्र शासनाच्या कुष्ठरोग  नागरी पर्यवेक्षकीय पथकाचे वैद्यकीय सहाय्यक नागेश कोष्टी, अवैद्यकीय सहाय्यक श्रीलेखा बिजरे, आनंदवनचे सरपंच नवनाथ मगर, सामाजिक कार्यकर्ते सुरेखा दोडमणी, निलेश दोडमणी, विक्रम मानेकर, अनिल कांबळे, सचिन कोष्टी, लक्ष्मी कापसे आदी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, कुष्ठरोग बाधितांच्या वसाहतीमध्ये कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र आज कार्यान्वित करून येथील बाधित घटकांचे लसीकरण करण्याचे काम महापालिकेने केले आहे. नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा महापालिकेच्या वतीने प्रयत्न केला जात आहे.

कोरोना विरुद्ध लढण्यासाठी बळ कमी पडते असे वाटत असताना लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन आणि नागरिक यांच्या सामुहिक प्रयत्नामुळे आणि सहकार्यामुळे आपण कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण रोखू शकलो. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेकजण योगदान देत आहेत. असेच सहकार्य कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेला रोखण्यासाठी आवश्यक आहे. कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी नियोजन केले जात असून सर्वांची साथ यासाठी आवश्यक आहे. कुष्ठरोग बाधितांना आवश्यक सर्व मदत करण्यास महापालिका पुढाकार घेऊन सेवेसाठी सदैव तत्पर असेल असे ढाकणे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.