Pimpri: जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त पालिकेतर्फे ‘कोरोना सोबत जगताना’ छायाचित्र स्पर्धा

'Corona Sobat Jagtana' photography competition on the occasion of World Photography Day.

एमपीसी न्यूज – जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने 7 ते 17 ऑगस्ट 2020 दरम्यान  ‘कोरोना सोबत जगताना’ या विषयावरील छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा विनामुल्य असून यामध्ये शहरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

याबाबतची माहिती देताना स्पर्धेच परिक्षक, प्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी सांगितले की, दरवर्षी 19 ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडलेला आहे. घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टिंगचे पालन करणे, मर्यादित प्रवाशांसह वाहन प्रवास करणे, मर्यादित कर्मचा-यांसह कार्यालयीन कामकाज करणे आदी बाबींचा दैनंदिन जीवनामध्ये नव्याने समावेश झाला आहे.

कोरोना सोबत जगताना दैनंदिन जीवनामध्ये आलेल्या बदलांचे चित्रण स्पर्धकांच्या छायाचित्रांमधून दिसणे अपेक्षित आहे असे कशाळीकर यांनी सांगितले.

स्पर्धेसाठी 21 वर्षाखालील गट, महिला गट व खुला गट असे तीन गट करण्यात आले आहेत. प्रत्येक गटामध्ये प्रथम क्रमांकासाठी 5 हजार रुपये, प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांकासाठी 3 हजार रुपये व प्रशस्तीपत्रक आणि तृतीय क्रमांकांसाठी 2 हजार रुपये,  प्रशस्तीपत्रक दिले जाणार आहे. तर, दोन उत्तेजनार्थ विजेत्यांसाठी प्रत्येकी 1 हजार रुपये व प्रशस्तीपत्रक अशा स्वरुपाची बक्षिसे दिली जाणार आहेत.

या स्पर्धेसाठी प्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांच्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि आर्टिस्ट कम छायाचित्रकार परिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक छायाचित्रकारांनी आपली छायाचित्रे  [email protected] या ईमेल वर त्यांच्या संपूर्ण नाव, वय, पत्ता व मोबाईल क्रमांकासह 10 ते 17 ऑगस्ट 2020 दरम्यान पाठवावेत.

प्रिंट स्वरूपातील छायाचित्रे स्पर्धेसाठी स्वीकारली जाणार नाहीत. एक स्पर्धक कमाल 5 छायाचित्रे स्पर्धेसाठी सादर करू शकेल. स्पर्धेसाठी पाठविण्यात येणारे प्रत्येक छायाचित्र किमान 2 एवीचे असावा.

या स्पर्धेसाठी मोबाईलवर काढलेले छायाचित्रे तसेच इतर कोणत्याही कॅमेराद्वारे काढण्यात आलेले छायाचित्रे पात्र राहतील. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी इच्छुकांनी विलास साळवी 8855892803 आणि खुशाल पुरंदरे  9665875088 यांच्याशी या नंबरवर संपर्क संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.