Pune News : कोरोना हात पाय पसरतो? पुण्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आठ दिवसात 150 ने वाढली

एमपीसी न्यूज : पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना पुन्हा हात पाय पसरतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण मागील आठ दिवसात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 150 ने वाढली आहे. सध्या पुणे शहरात ॲक्टिव रुग्णांची संख्या 990 इतकी आहे तर जिल्ह्यात 979 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. सोमवारी जिल्ह्यात 158 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. 

सोमवारी कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यात दिवसभरात 183 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा मृत्यू पिंपरी-चिंचवड परिसरातील व्यक्तीचा झाला आहे. सोमवारी दिवसभरात पुणे शहर, जिल्हा परिषद कार्यक्षेत्र, नगरपालिका आणि कँटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात एकूण 1979 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयात 565 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1414 रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.