रविवार, सप्टेंबर 25, 2022

Pimpri News: कोरोनाची लक्षणे जाणवताहेत, घसा दुखतोय, ‘एजिथ्रोमाइसिन’ घेऊन घरी बसू नका, जिवावर बेतेल…

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बरोबरच थंडी, ताप, सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अनेकजण घसा दुखू लागल्यानंतर कोरोनाची चाचणी करण्याऐवजी ‘एजिथ्रोमाइसिन’च्या तीन गोळ्यांचा कोर्से पूर्ण करुन घरीच राहत असल्याचे समोर आले आहे. असे करणे चुकीचे असून प्रकृती खालावल्यास जिवावर बेतेल. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे दिसताच कोरोनाची चाचणी करुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच योग्य ती औषधे घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून केले जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 1 जानेवारीपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या काही दिवसात हवेतील गारठाही वाढला आहे. त्यामुळे शहरात सर्दी, ताप, खोकला झालेल्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. केवळ डोके दुखते, घसा खवखवतो. असे म्हणत काही नागरिक मेडिकलमधून औषधे घेतात. घसा दुखू लागल्यानंतर कोरोनाची चाचणी करण्याऐवजी ‘एजिथ्रोमाइसिन’च्या तीन गोळ्यांचा कोर्से पूर्ण करुन घरीच राहत असल्याचे समोर आले आहे.

कोरोनाची चाचणी करायला जाण्याचे टाळले जाते. पण, असे करणे अत्यंत चुकीचे आहे. सर्दी, ताप झाला म्हणजे कोरोनाची चाचणी ‘पॉझिटीव्ह’ येईलच असे नाही. व्हायरलही असू शकते. त्यामुळे चाचणी न करता औषधे घेणे चुकीचे आहे. कोरोनाची चाचणी करणे महत्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे दिसताच कोरोनाची चाचणी करुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच योग्य ती औषधे घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून केले जात आहे.

”चिखली भागात अनेक नागरिक घसा दुखायला लागल्यानंतर ‘एजिथ्रोमाइसिन’च्या गोळ्या घेऊन जात आहेत. यावरुन नागरिक कोरोनाची चाचणी करणे टाळत असल्याचे दिसून येत असल्याचे” एका औषध विक्रेत्याने सांगितले.

”त्रास होत असल्यास कोणीही स्वत: घरी उपाचार करु नयेत. कोरोनाची चाचणी करुन घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपचार घ्यावेत, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले.

spot_img
Latest news
Related news