Corona Testing : स्वत:हून कोरोना चाचणी करणाऱ्यांकडून 2800 ऐवजी 2500 रुपये घ्यावेत – आरोग्यमंत्री

Take Rs 2500 instead of Rs 2800 from those who test corona on their own - Health Minister

एमपीसी न्यूज – खासगी प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी राज्य शासनाने 2200 व 2800 रुपये दर निश्चित केले आहेत. मात्र, प्रयोगशाळेत थेट तपासणीसाठी जाणाऱ्यांकडून 2800 रुपये न आकारता त्यांच्याकडून 2500 रुपये घ्यावेत, असा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच कोरोना चाचण्यांचे दर निश्चित केले आहेत.

त्यानुसार, रुग्णालयातून रुग्णाचा स्वॅब घेतल्यास त्यासाठी 2200 रुपये दर आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेऊन तपासणी केली तर त्यााठी 2500 रुपये आकारायचे असा निर्णय झाला.

मात्र, काही व्यक्ती, रुग्ण स्वत: थेट प्रयोगशाळेत जाऊन तपासणी करतात त्यांच्याकडून 2800 रुपये आकारले जात आहेत.

कोरोना चाचणी करण्यासाठी रुग्ण स्वत:हून आला तर प्रयोगशाळेला पीपीई कीट व वाहतुकीचा खर्च येत नाही. अशा वेळी त्यांच्याकडून 2800 रुपयांऐवजी 2500 रुपये आकारावेत, असा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यासाठी 2200 आणि 2800 यामधला टप्पा म्हणून 2500 रुपये राज्य शासनाने ठरवून दिले आहे.

राज्यात खासगी प्रयोगशाळा कोरोना चाचणीसाठी 4500 रुपये आकारत होत्या. घरी जाऊन स्वॅब घेतला तर त्यासाठी पीपीई कीटचा वापर करावा लागत असल्याने 5200 रुपये आकारले जात होते.

मात्र, समितीने केलेला अभ्यास आणि काढलेल्या निष्कर्षावरून आता राज्यात कोरोना चाचणीसाठी जास्तीत जास्त 2200 रुपये आकारले जातील.

घरी जाऊन केलेल्या चाचणीसाठी 2800 रुपये, तर स्वत:हून कोरोना चाचणी करणाऱ्यांकडून 2800 ऐवजी 2500 रुपये आकारले जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.