Corona Third Wave : कोरोनाची तिसरी लाट अपरिहार्य ; सरकारचे वैज्ञानिक सल्लागार

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे. संक्रमणाचा वेग वाढला आहे तसेच, मृतांची संख्या देखील वाढली आहे. अशात चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. कोरोनाची तिसरी लाट अपरिहार्य असून, ती टाळता येणार नाही. असे, सरकारच्या वैज्ञानिक सल्लागाराने म्हंटले आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. विजय राघवन यांनी असे सांगितले की देशात कोरोनाची तिसरी लाट अपरिहार्य आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा मुकाबला करण्यासाठी लस अपडेट करावी लागेल. यासह लसीकरण कार्यक्रमाला देखील गती देण्याची गरज आहे. भारतात कोरोना संसर्गाचा वेग अधिक झाला आहे. रुग्ण संख्या वाढल्याने रुग्णांना बेड उपलब्ध होईनात तसेच, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे.

डॉ. विजय राघवन म्हणाले, ज्या वेगाने कोरोना संसर्ग पसरत आहे अशा परिस्थितीत कोरोनाची संभाव्य तिसरी लाट टाळता येणं अवघड आहे. ही लाट कधी येईल याबाबत अनिश्चितता आहे. पण याबाबत आपल्याला सतर्क राहायला हवे तसेच, लस अद्यावत करण्यावर देखील लक्ष द्यावे लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.