Aundh: औंध रुग्णालयाची जिल्हाधिकारी यांच्याकडून पाहणी

corona updates Inspection of Aundh Hospital by the Collector naval kishor ram

एमपीसी न्यूज- सध्या पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी (दि.2) औंध येथील जिल्हा रुग्णालयाच्या कोविड केंद्राला भेट देवून पाहणी केली.

रुग्णालयातील कोविड व नॉन कोविड रुग्णांवर करण्यात येत असलेल्या उपचारांबाबत माहिती घेतली. जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णांना मानसिक आधार देणाऱ्या समुपदेशन केंद्राचीही माहिती घेतली. या रुग्णालयातील सर्व डॉक्टर व कर्मचारी यांच्या कामाचे कौतुक करुन सर्वांचे मनोबल वाढविले.

मानसोपचारतज्ज्ञ, रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या मनातील भीती घालवतात. रुग्णालयात किती दिवस रहावे लागेल, उपचाराची पद्धती याबाबत माहिती देतात.

उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि संबंधित कर्मचाऱ्यांचेही समुपदेशन केले जाते. जिल्हाधिकारी राम यांनी या कामाचे कौतुक केले. रुग्णालयातील स्वच्छता आणि वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समर्पित भावनेबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, डॉ. बी. एन‌ काकणे, डॉ. संतोष देशपांडे, डॉ. शर्मिला गायकवाड व रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.