Chakan News : पी के टेक्निकल कॅम्पसमध्ये कोरोना लसीकरण शिबीर

महाराष्ट्र शासनाच्या मिशन युवा स्वास्थ्य लसीकरण मोहिमेअंतर्गत उपक्रम

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पी के टेक्निकल कॅम्पसमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात आली. सोमवारी (दि. 25) रोजी ही मोहीम पार पडली. मिशन युवा स्वास्थ्य लसीकरण मोहीम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी राबविण्यात आली.

शिबिराचे उद्घाटन पी के फाउंडेशनच्या संस्था प्रतिनिधी निकिता खांडेभराड यांच्या हस्ते करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी शिबिरात लस घेतली. शिबिरानंतर पी के फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव खांडेभराड यांच्या हस्ते लसीकरणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

राज्य शासनाने शाळा महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे. दीड वर्ष ऑनलाईन शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी आता प्रत्यक्ष वर्गात बसून शिक्षण घेत आहेत. कोरोना साथीचा प्रादुर्भाव आटोक्यात यावा यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पी के टेक्निकल कॅम्पसमध्ये कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहीम घेण्यात आली. या मोहिमेअंतर्गत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचा संस्थेचा मानस आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.