Corona Vaccination : कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर

एमपीसी न्यूज – कोरोना लस आल्यानंतर ती लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येईल यासाठी केंद्र सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहे. या लसीकरणामधील पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस देण्याचा केंद्र सरकारचा मानस असून तसे निर्देश सर्व राज्यांना देण्यात आलेले आहेत.

या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे लसीकरण कसे होईल, यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे. दरम्यान, कोणत्या कोरोना लसीचा पहिला डोस भारतात देण्यात येणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

कसे होईल कोरोनाचे लसीकरण –
कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. यामध्ये 50 वर्षांवरील त्या व्यक्ती ज्यांना एखादा आजार आहे. तसेच 50 वर्षांखालील त्या व्यक्ती ज्या मधुमेह, कॅन्सर, हृदयरोग यांसारख्या आजारांनी ग्रस्त आहेत. तसेच सरकारी किंवा खाजगी रुग्णालयांमध्ये काम करणारे डॉक्टर्स, नर्स आणि तिनही सैन्यदलांचे प्रमुख, पॅरा मिलिट्री, म्युनिसिपल वर्कर्स आणि राज्यांतील पोलीस कर्मचारी यांचा समावेश असेल.

लसीकरणासाठी प्रत्येकी पाच लोकांची टीम तयार करण्यात येणार आहे.
यांना वॅक्सिनेटर ऑफिसर म्हटलं जाईल. पहिला वॅक्सिनेटर ऑफिसर लसीकरणाच्या ठिकाणी असेल, जो सर्व आवश्यक कागदपत्र तपासल्यानंतरच कोरोना लस घेण्यासाठी सेंटरमध्ये येण्यास परवानगी देईल. त्यानंतर दुसरा ऑफिसर Co Win शी डेटा जोडून पाहिल. तिसरा वॅक्सिनेटर ऑफिसर डॉक्टर असून व्यक्तीला लस देण्याचं काम करणार आहे. उर्वरित दोन वॅक्सिनेटर 30 मिनिटांपर्यंत लसीचा डोस दिलेल्या व्यक्तीचं निरिक्षण करतील आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचंही काम करतील. लसीकरणाची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. एका दिवसात जवळपास एक सेशन होईल आणि यामध्ये जवळपास 100 ते 200 लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात येईल.

लस दिल्यानंतर 30 मिनिटांपर्यंत वाट पाहावी लागणार –
लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केवळ Co Win वरच करता येणार आहे. हे अ‍ॅप केंद्रीय मंत्रालय, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनद्वारा अपलोड करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त 50 वर्षांवरील व्यक्तींना, जे एखाद्या आजाराने ग्रस्त असतील, ते स्वतः आपली माहिती अपलोड करु शकतील. जर एखादी व्यक्ती स्वतः आपली माहिती अपलोड करत असेल तर त्या व्यक्तीला 15 डॉक्युमेट्सपैकी एखादे ऑफिसरला द्यावे लागेल. हे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, हेल्थ इंश्युरन्स स्मार्ट कार्ड जे केंद्रीय श्रम मंत्रालयाने जारी केलेले आहे, MNREGA जॉब कार्ड, पॅन कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफसद्वारे जारी करण्यात आलेले पासबुक, पासपोर्ट, पेंशन डॉक्यूमेंट्स, सर्विस आयडेंटीटी कार्ड, वोटर कार्ड.

लसीकरणावेळी स्वच्छतेची घ्यावी लागणार काळजी-
राज्य सरकारला लसीकरणासाठी आवश्यक असणारी तयारी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. यासंदर्भात राज्य पातळीवर आणि जिल्हा पातळीवर तयार करण्यात आलेल्या कमिटीची बैठक पार पडली आहे. लसीकरणानंतर सिरिंज आणि इतर मेडिकल वेस्ट यांची विल्हेवाट कशी लावावी याबाबतही आदेश जारी करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.