Corona Vaccination : देशात पहिल्या दिवशी 1.65 लाख नागरिकांचे कोरोना लसीकरण

एमपीसी न्यूज – जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणाला आज भारतात सुरुवात झाली. दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील सफाई कर्मचारी मनिष कुमार यांना देशात सर्वात पहिली लस टोचण्यात आली. देशात आज दिवसभरात 1.65 लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठ्या कोविड-19 लसीकरण मोहिमेचा आज (शनिवारी) शुभारंभ केला. आज दिवसभरात केलेल्या लसीकरणाची आकडेवारी प्राप्त झाली असून देशातील एकूण 3 हजार 351 केंद्रांवर 1 लाख 65 हजार 714 लोकांना लस टोचण्यात आली. अकरा राज्यात सीरम आणि भारत बायोटेकची लस देण्यात आली तर, इतर राज्यात फक्त सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशील्ड टोचण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

देशात लसीकरणानंतर कुणालाही कोणतेही दुष्परिणाम झाले नसल्याचे निष्पन्न झाले. केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. पहिल्या टप्प्यातील लसीकरणात केवळ कोविड योद्ध्यांनाच प्राधान्य देण्यात आलं असून तीन कोटी लोकांना लस देण्यात येणार आहे.

दरम्यान, एम्स रुग्णालयात सफाई कर्मचारी मनिषकुमार यांनी सर्वप्रथम लस घेतली. ते म्हणाले, या प्रसिद्ध रुग्णालयातील मी पहिलाच व्यक्ती आहे ज्याला ही लस घेता आली. लस घेतल्यानंतर मी ठीक आहे. मला कुठलाही साईड इफेक्ट जाणवलेला नाही. लस घेतल्यानंतर माझी भीतीही निघून गेली आहे. माझ्याकडे पाहिल्यानंतर माझ्या सहकाऱ्यांनी देखील लस घेण्याची इच्छा झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.