Corona Vaccination : 6 ते 12 वयोगटातील मुलांच्या कोवेक्सिनला डीसीजीआयची मंजुरी

एमपीसी न्यूज – देशातील वाढत्या कोरोना प्रकरणांमध्ये मुलांच्या लसीकरणाशी संबंधित एक चांगली बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या लहान मुलांच्या म्हणजेच 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस मिळणार आहे. डीसीजीआयकडून कोवेक्सिनला मान्यता देण्यात आल्याचं समजत आहे.

 

मार्चच्या महिन्याच्या सुरूवातीला 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना कोविड लसीकरण करण्यात आले होते.आता डीसीजीआयने 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना कोवॅक्सीन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या तिसरा लाटेत लहान मुलांवर फारसा परिणाम झाला नाही,परंतू आता लहान मुले देखील कोरोनाचा नवीन प्रकार एक्सईच्या कचाट्यात सापडत आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर या प्रकरणात वाढ होण्याची भीती आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते,गेल्या तीन आठवड्यात मुलांमध्ये फ्ल्यूसारखी लक्षणे वाढली आहेत.त्याचवेळी, मंजुरी मिळाल्यानंतर सरकार लवकरच एक मार्गदर्शक तत्व जारी करणार असल्याच बोलल जातंय. ज्यामध्ये हे लसीकरण देशात केव्हा आणि कसे सुरू करावे हे सांगितले जाईल.

 

लहान मुलांमध्ये एक्सई व्हेरिएंटची लक्षणे

देशात सध्या जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावात घट झाली आहे.देशात रोज एक हजारांहून कमी प्रकरणे नोंदविली जात आहेत. त्यानंतर दोन वर्षानंतर देशातील सर्व निर्बंध संपले.मात्र कोरोनाच्या नव्या एक्सई व्हेरियंटनं चिंता वाढविली आहे.लहान मुलांचे लसीकरण झाले नसल्याने त्यांना विषाणूची लागण होण्याची शक्यता आहे.

लहान मुलांमधील लक्षणे साधारणपणे सौम्य असतात त्यात ताप, नाक वाहणे, घसा दुखणे, अंगदुखी, कोरडा खोकला यासारख्या लक्षणांचा समावेश होतो, असे डॅ. अवी कुमार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.