Corona Vaccination : खूशखबर! जानेवारीच्या अखेरपर्यंत देशातही कोरोना लसीकरणास सुरुवात होऊ शकते! 

एमपीसी न्यूज – कोरोनाला थोपवण्यासाठी अमेरिका, ब्रिटनसाख्या देशामध्ये लसीकरण कोरोनाला थोपवण्यासाठी अमेरिका, ब्रिटनसाख्या देशामध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जानेवारीच्या अखेरपर्यंत देशातही लसीकरणास सुरुवात होऊ शकते. तसे संकेत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SII) कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी दिले. ते एका जागतिक व्यापारविषयक बैठकीत (global business summit) बोलत होते.

“कोरोना विषाणूचा संसर्ग थोपवण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटतर्फे तयार करण्यात येत असलेल्या कोव्हीशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापरासाठी लवकरच परवानगी मिळू शकते. ही परवानगी केंद्र सरकार डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत देऊ शकते. तसेच, 2021 सालाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जानेवारी महिन्यात संपूर्ण भारत देशात लसीकरणाला सुरुवात होऊ शकते,” असे पुनावाला म्हणाले.

सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हीशिल्ड लस

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या भारतीय कंपनीकडून कोव्हीशिल्ड ही लस तयार करण्यात येत आहे. या लसीची निर्मिती ऑक्सफर्ड आणि अ‌ॅस्ट्राझेनेका या दोन संस्थांनी केलेली आहे. या संस्थांसोबत सीरमने करार करुन लसीच्या उत्पादनासाठी परवानगी घेतलेली आहे.

केंद्र सरकार 30 ते 40 कोटी डोस खरेदी करणार

आदर पुनावाला यांनी यावेळी सांगितलं की, सीरमतर्फे सरकार तसेच खासगी बाजारात विकण्यासाठी कोरोना लसीची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आगामी जुलै महिन्यापर्यंत केंद्र सरकार 30 ते 40 कोटी डोस सीरम कडून विकत घेणार आहे. तसेच केंद्रीय आणि कुटंब कल्याण मंत्रालय देशातील 20 ते 30 टक्के जनतेला कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याच्या तयारीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.