Corona vaccine : रशिया स्पुटनिक-5 लसीचे 10 कोटी डोस डॉ. रेड्डी लॅबला देणार

0

एमपीसी न्यूज – रशियाच्या स्पुटनिक-5 या लसीचे 10 कोटी डोस डॉ. रेड्डी लॅबला देणार असल्याचं रशियाने म्हटलं आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडाने या लशीच्या क्लिनिकल ट्रायल व वितरणासाठी सहकार्य करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘बीबीसी’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि डॉ. रेड्डी लॅब यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. भारतात या लशीचे 30 कोटी डोस तयार करण्यात येतील. डॉ. रेड्डी ही देशातल्या अग्रगण्य फार्मा कंपन्यांपैकी एक असून, लवकरच ही कंपनी सरकारच्या परवानगीनंतर फेज-3 क्लिनिकल ट्रायल सुरू करेल.

त्यानुसार लसीचा पुरवठा 2020 वर्षाच्या शेवटच्या महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. चाचणीच्या फेझ-1, फेझ-2 टप्पे आश्वासक आणि आशादायी आहेत असं डॉ. रेड्डी लॅबचे जीव्ही. प्रसाद यांनी सांगितले.

कोरोनावर जगातली पहिली नोंदणीकृत लस असं रशियाने स्पुटनिक व्ही लशीचं वर्णन केलं आहे. फेझ3 ट्रायल 40,000 लोकांवर घेण्यात आली. 26 ऑगस्टला ही प्रक्रिया सुरू झाली. मात्र, ही प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही.

फेज-3 ट्रायल पूर्ण होण्यापूर्वीच रशियाने लशीला परवानगी दिली. जगभरातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांमध्ये यामुळे साशंकतेचं वातावरण होतं. रशियाच्या या संस्थेने याआधी कझाकिस्तान, ब्राझील आणि मेक्सिकोला लस देण्याचं मान्य केलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.