Corona Vaccine : सीरम आणि भारत बायोटेकच्या लसीबाबत आरोग्य मंत्रालयाचा मोठा खुलासा

एमपीसी न्यूज – सीरम आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांनी कोरोनावरील लसीचा तात्काळ वापराच्या परवानगीसाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आल्याचे वृत्त केंद्रीय आरोग्य विभागाने फेटाळले आहे.

याबाबत आरोग्य मंत्रालयाकडून खुलासा करण्यात आला आहे. या दोन्ही कंपनीच्या लसीबाबत असा असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच या कंपन्यांचे अर्ज अपुऱ्या डेटामुळे नाकारण्यात आले आहेत.

CDSCO समितीने बुधवारी फायझर, सीरम आणि भारत बायोटेकच्या अर्जांचा आढावा घेतला. यावेळी लसीच्या सुरक्षितता आणि परिणामकारकतेबद्दल अधिक डाटा देण्यासंदर्भात सांगण्यात आले, त्यानंतरच या कंपन्यांचे अर्ज फेटाळण्यात आल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. मात्र डाटा अपुरा असल्याचे निरीक्षण नोंदवले म्हणजे परवानगी नाकारली, असा अर्थ होत नाही, असे CDSCO च्या समितीच्या सूत्रांनी म्हटले आहे.

समितीसमोर कंपनीकडून पुन्हा डाटा दिला जाईल, याशिवाय ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीजीसीआय) यावर अंतिम निर्णय घेत असते.

मागील काही दिवसांत तीन कंपन्यांनी डीसीजीआयकडे भारतात लसीच्या वापरास परवानगी देण्यासाठी अर्ज केले होते. यात सीरम, भारत बायोटेक आणि फायझर या तीन कंपन्यांचा समावेश होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.