Corona Vaccine Price : लसीच्या किंमती कमी करा ; केंद्र सरकारची सिरम, भारत बायोटेकला सूचना

0

एमपीसी न्यूज : देशात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाला वेग आला आहे. एक मे पासून अठरा वर्षांवरील सर्वजण लस घेण्यासाठी पात्र असतील. मात्र, राज्यांसाठी तसेच खासगी रुग्णालयांसाठी लस महाग दराने विकली जात असल्याची टिका होत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सिरम आणि भारत बायोटेक या दोन्ही लस उत्पादक कंपन्यांना लसीचे दर कमी करण्याची सूचना केली आहे.

सिरम आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांनी राज्ये सरकारं आणि खुल्या बाजारातील लसीचे दर अधिक ठेवल्याने केंद्राने त्यांना दर कमी करण्याची सूचना केली आहे. ‘पीटीआय’ने हे वृत्त दिलं आहे.

केंद्र सरकारने लसीकरण मोहीमेचा वेग वाढवण्यासाठी लस उत्पादक भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूटला लसीचे 50 टक्के उत्पादन हे राज्य सरकारे आणि खुल्या बाजारात विकण्याची परवानगी दिली. यानंतर लसीचे दर राज्ये आणि खुल्या बाजारासाठी जाहीर करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस राज्य सरकारला 600 रुपये आणि खासगी रुग्णालयांना 1200 रुपयांत विकली जाणार आहे. तर सिरमच्या कोविशील्ड लसीसाठी हा दर अनुक्रमे 400 आणि 600 रुपये इतका आहे. मात्र, या दोन्ही कंपन्यांनी केंद्र सरकारला या लसी अवघ्या 150 रुपयांना विकल्या होत्या.

यावरून केंद्र सरकार व लस उत्पादक कंपनीवर टिका केली जात आहे. लसीच्या दरावरून होत असलेल्या आरोपांनंतर आता केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला आपल्या लसींचे दर कमी करण्याची सूचना केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment