Corona Vaccine Update: लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल अपेक्षेप्रमाणे सकारात्मक-डोनाल्ड ट्रम्प

Corona Vaccine Update: Third Vaccine Trial Results Positive-Donald Trump

एमपीसी न्यूज – कोरोनावरील लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल अपेक्षेप्रमाणे सकारात्मक मिळत आहेत, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकेत लस देण्यासाठी  20 लाखहून अधिक डोस तयार आहेत. लसींच्या सुरक्षिततेबाबतची तपासणी पूर्ण झाल्यानंतर या लशींचे वितरण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. कोरोनावरील लशीसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर ट्रम्प बोलत होते.

ट्रम्प म्हणाले की, कोरोना लस विकसित करण्याबाबत आम्ही बरेच चांगले करत आहोत. लशीसंदर्भात आम्ही खूप वेगवान आहोत. जर लस सुरक्षितता तपासणीत यशस्वी झाली तर आम्ही तिचे 20 लाखहून अधिक डोस तयार केले आहेत.

कोरोना विषाणूमुळे बाधित सर्व 186 देश एकत्रितपणे लस विकसित करण्याचे काम करीत आहेत. या प्रकरणात चीनबरोबरही काम करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे, परंतु जे घडलंय ते व्हायला नको होतं, असेही ते म्हणाले.

लशीबाबत ट्रम्प यांनी प्रथमच दावा केलेला नाही. ट्रम्प आधीच म्हणाले आहेत की, या वर्षाच्या अखेरीस अमेरिका कोणत्याही परिस्थितीत कोरोना विषाणूची लस बनवेल. याशिवाय अमेरिकेत कोरोना विषाणूच्या उपचारात रेमेडासॅव्हिर औषध देखील वापरली जात आहे. असा दावा केला जात आहे की या औषधाने बरेच चांगले रिझल्ट दिले आहेत.

अमेरिकेसह जगातील बर्‍याच मोठ्या देशांमध्ये कोरोना विषाणूच्या लसीची क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.