Corona Vaccine Update: डिसेंबर अखेर कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होण्याची WHO ला आशा

Corona Vaccine Update: WHO expects corona vaccine to be available by the end of December जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांची माहिती

एमपीसी न्यूज – या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोना विषाणूची लस उपलब्ध होईल आशा आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिली. कोरोना विषाणूवरील प्रतिबंधक लशीसंदर्भात सुरू असलेल्या वैद्यकीय चाचण्यांबाबत माहिती देण्यासाठी जिनिव्हा येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 

सुमारे 10 लशी मानवी चाचणीच्या टप्प्यावर आहेत. या व्यतिरिक्त कमीतकमी तीन लशी देखील मानवी चाचणीच्या टप्प्यात प्रवेश करत आहे. यापैकी एक लस तरी नक्कीच प्रभावी ठरू शकेल, असे त्या म्हणाल्या.

“मला आशा आहे, किंबहुना खात्री आहे, पण लस विकसित करणे ही एक खूपच जटिल प्रक्रिया आहे, तसेच त्यात तेवढीच अनिश्चितता आहे. एक चांगली गोष्ट आहे की, आपल्याकडे अनेक लशींचे आणि संस्थांचे पर्याय उपलब्ध आहेत,” असे स्वामीनाथन यांनी सांगितले.

आपण भाग्यवान असलो तर या वर्षांच्या शेवटी एक किंवा दोन लसी विकसित करण्यात निश्चित यशस्वी झालेले असू, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.