Corona Vaccine Update : राज्यात कोरोना लशीचे ड्राय रन सुरु

एमपीसी न्यूज : कोरोना लशीसंदर्भात भारत आता नव्या वर्षात एक पाऊल पुढे टाकत आहे. यासंदर्भात गुरुवारी आरोग्य मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला असून, आता आज 2 जानेवारीपासून देशाच्या प्रत्येक राज्यात कोरोना लशीचे ड्राय रन सुरु करण्यात येणार आहे.

आतापर्यंत केवळ चार राज्यांतच अशा प्रकारचे ड्राय रन करण्यात आले आहे. यात पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश समावेश होता. या चारही राज्यांतून ड्राय रनचे चांगले रिझल्ट समोर आले होते. यानंतर सरकारने संपूर्ण देशातच हे ड्राय रन करण्याचा निर्णय घेतला आहे.

ड्राय रनमध्ये म्हणजे काय ?

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सुचूनांनुसार, ड्राय रनमध्ये राज्यांना आपली दोन शहरे निवडावी लागतील. या दोन शहरांत लस पोहचवणे, रुग्णालयापर्यंत जाणे, लोकांना बोलावणे, यानंतर डोस देण्याचे संपूर्ण प्रक्रियेचे पालन लसीकरण सुरु असल्याप्रमाणे केले जाईल.

लस जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा टप्पायात सुमारे 300 दक्षलक्ष लोकांनी दिली जाईल. प्रथम ही लस कोणाला दिली जाईल. सर्व प्रथम एक गंभीर आजार असलेले लोक, आरोग्यसेवेतील कर्मचारी फ्रंटलाईन कर्मचारी आणि 50 वर्षांवरील लोकांचा यात समावेश असणारे आहे, असे सरकारने म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.