Corona Virus World Update: चिंताजनक! गेले दोन दिवस दररोज एक लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची भर

Corona Virus World Update: Worrying! Over the past two days, more than one lakh corona patients have been admitted every day

एमपीसी न्यूज – जगभरात गेल्या दोन दिवसांत दररोज एक लाखांपेक्षा अधिक नवीन कोरोना रुग्ण वाढत असल्याने जगाच्या चिंतेत वाढ झाली आहे. मात्र कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या व टक्केवारी थोडी वाढत आहे. परिणामी जगातील सक्रिय कोरोना रुग्णांच्या टक्केवारीत घट सुरूच असल्याचे सकारात्मक संकेतही मिळत आहे. कोरोनाच्या जागतिक मृत्यूदरातही सातत्याने घट होत आहे. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 51 लाख 94 हजार 099 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 3 लाख 34 हजार 616 (6.44 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 20 लाख 80 हजार 923 (39.06 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 27 लाख 78 हजार 560 (53.49 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 27 लाख 32 हजार 940 (98 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 45 हजार 620 (2 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

15 मे – नवे रुग्ण 99 हजार 405  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 072

16 मे – नवे रुग्ण 95 हजार 518 दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 360

17 मे – नवे रुग्ण 82 हजार 257 दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 618

18 मे – नवे रुग्ण 88 हजार 858 दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 445

19 मे – नवे रुग्ण 94 हजार 813 दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 589

20 मे – नवे रुग्ण 1 लाख 474 दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 685

21 मे – नवे रुग्ण 1 लाख 07 हजार 085 दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 934

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 16 लाखांच्या पुढे

अमेरिकेत गुरुवारी 1,418 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबळींचा आकडा 96 हजार 354 पर्यंत पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 16 लाख 20 हजार 902 झाली आहे तर 3 लाख 82 हजार 169 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

ब्राझीलमध्ये काल (गुरुवारी) 1188, मेक्सिको 424 तर इंग्लंडमध्ये 338 कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत.  इटलीमध्ये 156, भारत 150, रशिया 127, पेरू 124, कॅनडा 121, फ्रान्स 83, इराण 66 तर स्पेनमध्ये 52 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

जागतिक क्रमवारीत ब्राझील आता तिसऱ्या स्थानावर

ब्राझीलमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत स्पेनला मागे टाकत ब्राझील आता तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. ब्राझीनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येने तीन लाखांचा तर कोरोना बळींच्या आकड्याने 20 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

ब्राझीलमध्ये गुरुवारी 17 हजार 564 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्याच बरोबर काल एका दिवसात 1,188 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मृतांचा हा आकडा आतापर्यंतचा ब्राझीलमधील एका दिवसातील कोरोनाबळींचा सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे कोरोना बळींचा एकूण आकडा 20 हजार 82 पर्यंत वाढला आहे. गेल्या तीन दिवसात ब्राझीलमध्ये मृत्यूने थैमान घातले आहे. मंगळवारी 1130 कोरोना बळी गेली. बुधवारी हा आकडा 911 पर्यंत खाली आला आणि गुरूवारी एकदम 1188 पर्यंत वाढला आहे.

जागतिक क्रमवारीत भारत 11 व्या स्थानावर कायम आहे, मात्र गेली काही दिवस 20 व्या स्थानावर असलेला पाकिस्तान आता 19 व्या क्रमांकावर पोहचला आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 16,20,902 (+28,179), मृत 96,354 (+1,418)
  2. रशिया – कोरोनाबाधित 3,17,554 (+8,849), मृत 3,099 (+127)
  3. ब्राझील – कोरोनाबाधित 3,10,921 (+17,564), मृत 20,082 (+1,188)
  4. स्पेन – कोरोनाबाधित 2,80,117 (+593), मृत 27,940 (+52)
  5. यू. के. – कोरोनाबाधित 250,908 (+2,615), मृत 36,042 (+338)
  6. इटली – कोरोनाबाधित 2,28,006 (+642), मृत 32,486 (+156)
  7. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,81,826 (+251), मृत 28,215 (+83)
  8. जर्मनी – कोरोनाबाधित 1,79,021 (+490), मृत 8,309 (+39)
  9. टर्की – कोरोनाबाधित 1,53,548 (+961), मृत 4,249 (+27)
  10. इराण – कोरोनाबाधित 1,29,341 (+2,392), मृत 7,249 (+66)
  11. भारत – कोरोनाबाधित 1,18,226 (+6,198) , मृत 3,584 (+150)
  12. पेरू –  कोरोनाबाधित 1,08,769 (+4,749) , मृत 3,148 (+124)
  13. चीन – कोरोनाबाधित 82,967 (+2), मृत 4,634 (+0)
  14. कॅनडा –  कोरोनाबाधित 81,324 (+1,182), मृत 6,152 (+121)
  15. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 65,077 (+2,532) मृत 351 (+12)
  16. चिली – कोरोनाबाधित 57,581 (+3,964), मृत 589 (+45)
  17. मेक्सिको – कोरोनाबाधित 56,594 (+2,248), मृत 6,090 (+424)
  18. बेल्जियम – कोरोनाबाधित 56,235 (+252), मृत 9,186 (+36)
  19. पाकिस्तान – कोरोनाबाधित 48,091 (+2,193), मृत 1,017 (+32)
  20. नेदरलँड – कोरोनाबाधित 44,700 (+253), मृत 5,775 (+27)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.