Corona Tested : पुण्यातील कंपनीने तयार केलेल्या अॅपच्या मदतीने घरीच होणार कोरोनाची चाचणी; ICMR ने दिली मंजुरी

एमपीसी न्यूज : आयसीएमआरने (ICMR) एका अशा टेस्ट किटला मंजुरी दिली आहे. याच्या मदतीने आपण घरीच कोरोनाची चाचणी करू शकतो. आयसीएमआरने होम आयसोलेशन टेस्टींग किटसाठी (MY LAB DISCOVERY SOLUTION LTD ) माय लॅब डिस्कवरी सॉल्यूशंस लिमिटेड या पुण्यातील कंपनीला मंजुरी दिली आहे. 

या किटचे नाव COVISELF (Pathocatch) असे आहे. या किटच्या साहायाने नागरिक घरीच कोरोनाचे नाकाद्वारे नमुने घेता येणार आहेत. यासाठी आयसीएमआरने मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. दरम्यान, होम टेस्टिंग अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअर वर उपलब्ध आहे. घरी चाचणी करणाऱ्या नागरिकांना ह अॅप डाऊनलोड करावे लागेल. दरम्यान मोबाईल अॅपची चाचणी प्रक्रिया पूर्णपणे समजवण्यात आली आहे आहे.

Video Link for demonstration video along with illustrated Video In English and Hindi

Video

 

अशा आहेत सूचना…

  • घरीच कोरोना चाचणी करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवरून मोबाईल अॅप डाउनलोड करावे लागेल.
  • घरीच करण्यात येणारी ही चाचणी कंपनीने दिलेल्या म्युन्युअलनुसार केली जावी.
  • फक्त लक्षणे असलेल्या नागरिकांना याद्वारे घरीच चाचणी करता येईल. तसेच असे नागरिक जे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात अले असतील.
  • मोबाइल अॅपद्वारे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह रिपोर्ट मिळेल.
  • जे घरीच चाचणी करणार आहेत त्यांना टेस्ट स्ट्रीपचा फोटो काढावा लागेल आणि ज्या फोनवर अॅप डाउनलोड केले आहे त्याच फोनवर हा फोटो काढावा लागेल.
  • मोबाईल फोनवरील डाटा हा थेट आयसीएमआरच्या टेस्टींग पोर्टल स्टोअरवर जाईल.
  • रुग्णाची गोपनियता कायम ठेवली जाईल
  • या टेस्टद्वारे ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल ते पॉझिटिव्ह समजले जातील आणि त्यांना इतर कुठल्या टेस्टची गरज पडणार नाही.
  • जे नागरिक पॉझिटिव्ह आढळतील त्यांना होम आयसोलेशनबाबत आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल..
  • लक्षणे असूनही त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल त्यांना RTPCR टेस्ट करावी लागेल.
  • सर्व रॅपिड अँटिजन निगेटिव्ह असलेल्यांना लक्षणे नसलेली किंवा संशयित कोविड रुग्ण मानले जाईल आणि जोपर्यंत RTPCR टेस्टचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत त्यांना होम आयसोलेशनमध्येच रहावे लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.