Corona World Update: जगातील 2 कोटी 64 लाखांपैकी 1 कोटी 86 लाख रुग्णांची कोरोनावर मात

जगातील कोरोनामुक्तांचे प्रमाण 70.51 टक्क्यांवर, मृत्यूदर 3.3 टक्के तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 26.18 टक्क्यांवर

MPC News (Vivek Inamdar) – कोरोना विषाणूचा आतापर्यंत जगातील 2 कोटी 64 लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला असून त्यापैकी  1 कोटी 86 लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना बळींच्या आकडा 8 लाख 73 हजारांच्या पुढे गेला आहे. कोरोनामुक्तांचे प्रमाण 70.5 टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 26.19 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. सक्रिय रुग्णांपैकी केवळ 0.88 टक्के रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. काल (गुरुवारी) दिवसभरात सुमारे 2 लाख 88 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली. त्याच वेळी सुमारे 2 लाख 17 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 2 कोटी 64 लाख 67 हजार 490 झाली असून आतापर्यंत एकूण 8 लाख 73 हजार 213 (3.3 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1 लाख 86 लाख 61 हजार 504 (70.51 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 69 लाख 32 हजार 773 (26.19 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 68 लाख 72 हजार 028 (99.12 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 60 हजार 745 (0.88 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.  

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

28 ऑगस्ट – नवे रुग्ण 2 लाख 84 हजार 967, कोरोनामुक्त 2 लाख 04 हजार 030, मृतांची संख्या 5 हजार 710

29 ऑगस्ट – नवे रुग्ण 2 लाख 57 हजार 746, कोरोनामुक्त 2 लाख 10 हजार 722, मृतांची संख्या 5 हजार 304

30 ऑगस्ट – नवे रुग्ण 2 लाख 20 हजार 670, कोरोनामुक्त 2 लाख 103, मृतांची संख्या 4 हजार 182

31 ऑगस्ट – नवे रुग्ण 2 लाख 44 हजार 557, कोरोनामुक्त 2 लाख 32 हजार 338, मृतांची संख्या 4 हजार 221

1 सप्टेंबर – नवे रुग्ण 2 लाख 60 हजार 004, कोरोनामुक्त 2 लाख 53 हजार 846, मृतांची संख्या 5 हजार 899

2 सप्टेंबर – नवे रुग्ण 2 लाख 86 हजार 369, कोरोनामुक्त 2 लाख 49 हजार 232, मृतांची संख्या 6 हजार 316

3 सप्टेंबर – नवे रुग्ण 2 लाख 88 हजार 229 , कोरोनामुक्त 2 लाख 17 हजार 270, मृतांची संख्या 5 हजार 901


Source – https://www.worldometers.info/coronavirus/

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या, मृतांची संख्या व कोरोनामुक्तांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.