Corona World Update: 121 लाखांपैकी 70 लाखांहून अधिक रुग्णांनी जिंकली कोरोनाची लढाई

Corona World Update: More than 70 lakh patients out of 121 lakh won the battle of Corona कोरोनामुक्ताचे प्रमाण 58.07 टक्के, कोरोना मृत्यूदर 4.54 टक्के तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 37.39 टक्क्यांपर्यंत खाली

एमपीसी न्यूज – जगातील एकूण कोरोना संसर्ग 1 कोटी 21 लाखांपेक्षा अधिक वाढला आहे. त्यातील 70.64 लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. जगातील कोरोनामुक्तांचे प्रमाण आता 58 टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. विशेष म्हणजे काल (बुधवारी) एका दिवसात 1 लाख 80 हजार 290 रुग्ण बरे झाले.  त्याच वेळी 2 लाख 13 हजार 280 नव्या रुग्णांची भर पडली. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 1 कोटी 21 लाख 66 हजार 688 झाली असून आतापर्यंत एकूण 5 लाख 52 हजार 046 (4.54 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 70 लाख 64 हजार 772 (58.07 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 45 लाख 49 हजार 870 (37.39 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 44 लाख 91 हजार 551 (98.72 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 58 हजार 319 (1.28 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

2 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 08 हजार 864, कोरोनामुक्त 2 लाख 278 , मृतांची संख्या 5 हजार 155

3 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 09 हजार 028, कोरोनामुक्त 1 लाख 34 हजार 276 , मृतांची संख्या 5 हजार 170

4 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 89 हजार 413, कोरोनामुक्त 1 लाख 41 हजार 408 , मृतांची संख्या 4 हजार 489

5 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 75 हजार 499, कोरोनामुक्त 97 हजार 176 , मृतांची संख्या 3 हजार 572

6 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 71 हजार 508, कोरोनामुक्त 1 लाख 06 हजार 240 , मृतांची संख्या 3 हजार 583

7 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 08 हजार 087, कोरोनामुक्त 2 लाख 08 हजार 243, मृतांची संख्या 5 हजार 515

8 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 13 हजार 280, कोरोनामुक्त 1 लाख 80 हजार 299, मृतांची संख्या 5 हजार 518

अमेरिकेतील कोरोना संसर्ग 31.58 लाखांवर

अमेरिकेत बुधवारी 61 हजार 848 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 31 हजार 58 लाख 932 झाली आहे. बुधवारी अमेरिकेत 890 कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना बळींचा आकडा 1 लाख 34 हजार 862 पर्यंत वाढला आहे. अमेरिकेत 13 लाख 92 हजार 679 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजून अमेरिकेत 16 लाख 31 हजार 391 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

ब्राझीलमध्ये बुधवारी 1,187 कोरोना बळी

ब्राझीलमध्ये बुधवारी 1,187 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे ब्राझीलमधील कोरोना बळींचा आकडा 68 हजार 55 वर पोहचला आहे. ब्राझीलमधील कोरोनाबाधितांची संख्या 17 लाख 16 हजार 196 झाली असून त्यापैकी 11 लाख 17 हजार 922 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आता ब्राझीलमध्ये 5 लाख 30 हजार 219 सक्रिय कोरोना रुग्ण उरले आहेत.

मेक्सिकोत बुधवारी 895 कोरोनाबाधितांचा मृत्यू

मेक्सिकोत बुधवारी 895 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे मेक्सिकोतील कोरोना बळींचा आकडा 32,014 झाला आहे. मेक्सिकोतील कोरोना संसर्ग आता 2 लाख 68 हजार 008 पर्यंत वाढला आहे. त्यापैकी 1 लाख 63 हजार 646 रुग्ण बरे झाले असून 72 हजार 348 रुग्ण सक्रिय आहेत.

भारतात बुधवारी 491 कोरोना बळी

भारतात बुधवारी 491 कोरोनाबाधित मृत्यूंची नोंद झाली. पेरूमध्ये 181, रशियामध्ये 173, कोलंबियात 168, इराणमध्ये 153, चिलीमध्ये 139, यूकेमध्ये 126, दक्षिण अफ्रिकेत 100 कोरोना बळी गेले. इराकमध्ये 94, पाकिस्तानात 83, इजिप्तमध्ये 75, बोलिवियामध्ये 54, अर्जेंटिना व इंडोनेशियात प्रत्येकी 50 कोरोना मृत्यू नोंदविले गेले.

दक्षिण अफ्रिका 13 व्या तर बांगलादेश 17 व्या स्थानावर

सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत दक्षिण अफ्रिकेने सौदी अरेबियाला मागे टाकत 14 वे स्थान मिळविले आहे तर बांगलादेश फ्रान्सला मागे टाकून 17 व्या स्थानावर पोहचला आहे. आता सौदी अरेबिया 14 व्या तर फ्रान्स 18 व्या स्थानावर आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 31,58,932 (+61,848), मृत 1,34,862 (+890)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 17,16,196 (+41,541), मृत 68,055 (+1,187)
  3. भारत – कोरोनाबाधित 76,90,521 (+25,571) , मृत 21,144 (+491)
  4. रशिया – कोरोनाबाधित 7,00,792 (+6,562), मृत 10,667 (+173)
  5. पेरू – कोरोनाबाधित 3,12,911 (+3,633), मृत 10,952 (+180)
  6. चिली – कोरोनाबाधित 3,03,083 (+2,064), मृत 6,573 (+139)
  7. स्पेन –  कोरोनाबाधित 2,99,593 (+383), मृत 28,396 (+4)
  8. यू. के. – कोरोनाबाधित 2,86,979 (+630), मृत 44,517 (+126)
  9. मेक्सिको – कोरोनाबाधित 2,68,008 (+6,258), मृत 32,014 (+895)
  10. इराण – कोरोनाबाधित 2,48,379 (+2,691), मृत 12,084 (+153)
  11. इटली – कोरोनाबाधित 2,42,149 (+193), मृत 34,914 (+15)
  12. पाकिस्तान – कोरोनाबाधित 2,37,489 (+2,980), मृत 4,922 (+83)
  13. दक्षिण अफ्रिका – कोरोनाबाधित 2,24,665 (+8,810), मृत 3,602 (+100)
  14. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 2,20,144 (+3,036), मृत 2,059 (+42)
  15. टर्की – कोरोनाबाधित 2,08,938 (+1,041) मृत 5,282 (+22)
  16. जर्मनी – कोरोनाबाधित 1,98,765 (+410), मृत 9,115 (+12)
  17. बांगलादेशकोरोनाबाधित 1,72,134 (+3,489), मृत 2,197 (+46)
  18. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,69,473 (+663), मृत 29,965 (+32)
  19. कोलंबिया – कोरोनाबाधित 1,28,638 (+4,144), मृत 4,527 (+168)
  20. कॅनडा –  कोरोनाबाधित 1,06,434 (+267), मृत 8,737 (+26)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.