Corona World Update: तीन कोटींपैकी 2.18 कोटी रुग्णांची कोरोनावर मात, कोरोनामुक्तांची टक्केवारी 72.59 वर!

MPC News (Vivek Inamdar) –  जगातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने काल तीन कोटींचा टप्पा ओलांडला. नव्या कोरोनाबाधितांमधील भारतातील रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूचा आतापर्यंत जगातील तीन कोटींहून अधिक लोकांना संसर्ग झाला असून त्यापैकी सुमारे 2 कोटी 18 लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना बळींच्या आकडा 9 लाख 45 हजारांच्या पुढे गेला आहे. कोरोनामुक्तांचे प्रमाण 72.59 टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 24.27 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.  

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 3 कोटी 34 हजार 508 झाली असून आतापर्यंत एकूण 9 लाख 45 हजार 092 (3.15 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 2 कोटी 18 लाख 991 (72.59 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 72 लाख 88 हजार 425 (24.27 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 72 लाख 27 हजार 181 (99.16 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 61 हजार 244 (0.84 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.  

मागील तीन दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

14 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 2 लाख 42 हजार 856, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 48 हजार 690, मृत्यू 4 हजार 379

15 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 2 लाख 78 हजार 856 , नवीन कोरोनामुक्त 2 लाख 61 हजार 765, मृत्यू 6 हजार 005

16 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 08 हजार 226, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 62 हजार 620, मृत्यू 6 हजार 229

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

 

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या, मृतांची संख्या व कोरोनामुक्तांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.