Corona World Update: एका दिवसात सर्वाधिक 2.37 लाख नव्या रुग्णांची भर, कोरोना संसर्ग सव्वा कोटींच्या पुढे!

Corona World Update: 2.23 lakh new patients added in one day, corona infection exceeds 1.25 Crore जगात 58.31 टक्के रुग्ण कोरोनामुक्त, मृत्यूदर 4.46 टक्के तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 37.23 टक्क्यांपर्यंत खाली

एमपीसी न्यूज – जगभरात काल (शुक्रवारी) आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 2 लाख 36 हजार 918 नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे जगातील एकूण कोरोना संसर्ग सव्वा कोटींच्या पुढे वाढला आहे. त्यातील 73.61 लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. जगातील कोरोनामुक्तांचे प्रमाण आता 58.31 टक्के झाले आहे. काल (शुक्रवारी) एका दिवसात 1 लाख 47 हजार 743 रुग्ण बरे झाले. कोरोनाबाधित मृतांचे प्रमाण आता 4.46 टक्क्यांपर्यंत कमी आले आहे, ही थोडा दिलासा देणारी बाब मानण्यात येत आहे. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 1 कोटी 26 लाख 25 हजार 860 झाली असून आतापर्यंत एकूण 5 लाख 62 हजार 820 (4.46 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 73 लाख 61 हजार 659 (58.31 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 47 लाख 01 हजार 381 (37.23 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 46 लाख 42 हजार 483 (98.75 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 58 हजार 898 (1.25 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

4 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 89 हजार 413, कोरोनामुक्त 1 लाख 41 हजार 408 , मृतांची संख्या 4 हजार 489

5 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 75 हजार 499, कोरोनामुक्त 97 हजार 176 , मृतांची संख्या 3 हजार 572

6 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 71 हजार 508, कोरोनामुक्त 1 लाख 06 हजार 240 , मृतांची संख्या 3 हजार 583

7 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 08 हजार 087, कोरोनामुक्त 2 लाख 08 हजार 243, मृतांची संख्या 5 हजार 515

8 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 13 हजार 280, कोरोनामुक्त 1 लाख 80 हजार 299, मृतांची संख्या 5 हजार 518

9 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 22 हजार 825, कोरोनामुक्त 1 लाख 56 हजार 623, मृतांची संख्या 5 हजार 404

10 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 36 हजार 918,  कोरोनामुक्त 1 लाख 47 हजार 743, मृतांची संख्या 5 हजार 416

अमेरिकेतील कोरोना संसर्ग 33 लाखांच्या उंबरठ्यावर

अमेरिकेत शुक्रवारी 71 हजार 787 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 32 लाख 91 हजार 786 झाली आहे. शुक्रवारी अमेरिकेत 849 कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना बळींचा आकडा 1 लाख 36 हजार 671 पर्यंत वाढला आहे. अमेरिकेत 14 लाख 60 हजार 495 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजून अमेरिकेत 16 लाख 94 हजार 620 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

ब्राझीलमध्ये 70 हजारांहून अधिक कोरोना बळी

ब्राझीलमध्ये शुक्रवारी 1,270 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे ब्राझीलमधील कोरोना बळींचा आकडा 70 हजार524 वर पोहचला आहे. ब्राझीलमधील कोरोनाबाधितांची संख्या 18 लाख 04 हजार 338 झाली असून त्यापैकी 11 लाख 85 हजार 596 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आता ब्राझीलमध्ये 5 लाख 48 हजार 218 सक्रिय कोरोना रुग्ण उरले आहेत.

मेक्सिकोत शुक्रवारी 730 कोरोनाबाधितांचा मृत्यू

मेक्सिकोत शुक्रवारी 730 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे मेक्सिकोतील कोरोना बळींचा आकडा 33 हजार 526 झाला आहे. मेक्सिकोतील कोरोना संसर्ग आता 2 लाख 82 हजार 283 पर्यंत वाढला आहे. त्यापैकी 1 लाख 72 हजार 230 रुग्ण बरे झाले असून 76 हजार 527 रुग्ण सक्रिय आहेत.


भारतात शुक्रवारी 521
कोरोना बळी

भारतात शुक्रवारी 521 कोरोनाबाधित मृत्यूंची नोंद झाली. कोलंबियात 211, पेरूमध्ये 186, रशियात 174, इराणमध्ये 142, दक्षिण अफ्रिकेत 140 कोरोना बळी गेले. चिलीमध्ये 99 तर इजिप्तमध्ये 85, इराकमध्ये 78, पाकिस्तानात 75, इंडोनेशियात 52 तर सौदीअरेबियामध्ये 51 कोरोना मृत्यू नोंदविले गेले.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 32,91,786 (+71,787), मृत 1,36,671 (+849)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 18,04,338 (+45,235), मृत 70,524 (+1,270)
  3. भारत – कोरोनाबाधित 8,22,603 (+27,761) , मृत 22,144 (+521)
  4. रशिया – कोरोनाबाधित 7,13,936 (+6,635), मृत 11,017 (+174)
  5. पेरू – कोरोनाबाधित 3,19,646 (+3,198), मृत 11,500 (+186)
  6. चिली – कोरोनाबाधित 3,09,274 (+3,058), मृत 6,781 (+99)
  7. स्पेन –  कोरोनाबाधित 3,00,988 (+852), मृत 28,403 (+2)
  8. यू. के. – कोरोनाबाधित 2,88,133 (+512), मृत 44,650 (+48)
  9. मेक्सिको – कोरोनाबाधित 2,82,283 (+7,280), मृत 33,526 (+730)
  10. इराण – कोरोनाबाधित 2,52,720 (+2,262), मृत 12,447 (+142)
  11. दक्षिण अफ्रिका – कोरोनाबाधित 2,50,687 (+12,348), मृत 3,860 (+140)
  12. पाकिस्तान – कोरोनाबाधित 2,43,599 (+2,751), मृत 5,058 (+75)
  13. इटली – कोरोनाबाधित 2,42,639 (+276), मृत 34,938 (+12)
  14. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 2,26,486 (+3,159), मृत 2,151 (+51)
  15. टर्की – कोरोनाबाधित 2,10,965 (+1,003) मृत 5,323 (+23)
  16. जर्मनी – कोरोनाबाधित 1,99,588 (+390), मृत 9,130 (+5)
  17. बांगलादेशकोरोनाबाधित 1,78,443 (+2,949), मृत 2,275 (+37)
  18. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,70,752 (+658), मृत 30,004 (+25)
  19. कोलंबिया – कोरोनाबाधित 1,40,776 (+6,803), मृत 4,925 (+211)
  20. कॅनडा –  कोरोनाबाधित 1,07,126 (+321), मृत 8,759 (+10)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.