Corona World Update: गुरुवारी सर्वाधिक 2.23 लाख नवे रुग्ण तर 1.57 लाख रुग्ण कोरोनामुक्त!

Corona World Update: 2.23 lakh new patients and 1.57 lakh patients discharged on Thursday! एकूण 58.02 टक्के कोरोनामुक्त, 4.5 टक्के रुग्णांचा मृत्यू तर सक्रिय रुग्ण उरले 37.48 टक्के!

एमपीसी न्यूज – जगभरात काल (गुरुवारी) नवीन 2 लाख 22 हजार 825 कोरोना रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे जगातील एकूण कोरोना संसर्ग 1 कोटी 23 लाख 86 हजार 274 पर्यंत वाढला आहे. त्यातील 71.86 लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. जगातील कोरोनामुक्तांचे प्रमाण आता 58 टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. काल (गुरुवारी) एका दिवसात 1 लाख 56 हजार 623 रुग्ण बरे झाले. कोरोनाबाधित मृतांचे प्रमाण आता 4.5 टक्क्यांपर्यंत कमी आले आहे, ही थोडा दिलासा देणारी बाब मानण्यात येत आहे. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 1 कोटी 23 लाख 86 हजार 274 झाली असून आतापर्यंत एकूण 5 लाख 57 हजार 334 (4.50 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 71 लाख 86 हजार 901 (58.02 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 46 लाख 42 हजार 039 (37.48 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 45 लाख 83 हजार 585 (98.74 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 58 हजार 454 (1.26 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

3 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 09 हजार 028, कोरोनामुक्त 1 लाख 34 हजार 276 , मृतांची संख्या 5 हजार 170

4 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 89 हजार 413, कोरोनामुक्त 1 लाख 41 हजार 408 , मृतांची संख्या 4 हजार 489

5 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 75 हजार 499, कोरोनामुक्त 97 हजार 176 , मृतांची संख्या 3 हजार 572

6 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 71 हजार 508, कोरोनामुक्त 1 लाख 06 हजार 240 , मृतांची संख्या 3 हजार 583

7 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 08 हजार 087, कोरोनामुक्त 2 लाख 08 हजार 243, मृतांची संख्या 5 हजार 515

8 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 13 हजार 280, कोरोनामुक्त 1 लाख 80 हजार 299, मृतांची संख्या 5 हजार 518

9 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 22 हजार 825, कोरोनामुक्त 1 लाख 56 हजार 623, मृतांची संख्या 5 हजार 404

अमेरिकेतील कोरोना संसर्ग 32.19 लाखांवर

अमेरिकेत गुरुवारी 61 हजार 067 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 32 लाख 19 हजार 999 झाली आहे. गुरुवारी अमेरिकेत 960 कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना बळींचा आकडा 1 लाख 35 हजार 822 पर्यंत वाढला आहे. अमेरिकेत 14 लाख 26 हजार 428 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजून अमेरिकेत 16 लाख 57 हजार 749 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

ब्राझीलमध्ये गुरुवारी 1,199 कोरोना बळी

ब्राझीलमध्ये गुरुवारी 1,199 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे ब्राझीलमधील कोरोना बळींचा आकडा 69 हजार 254 वर पोहचला आहे. ब्राझीलमधील कोरोनाबाधितांची संख्या 17 लाख 59 हजार 103 झाली असून त्यापैकी 11 लाख 52 हजार 467 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आता ब्राझीलमध्ये 5 लाख 37 हजार 382 सक्रिय कोरोना रुग्ण उरले आहेत.

मेक्सिकोत गुरुवारी 782 कोरोनाबाधितांचा मृत्यू

मेक्सिकोत गुरुवारी 782 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे मेक्सिकोतील कोरोना बळींचा आकडा 32 हजार 796 झाला आहे. मेक्सिकोतील कोरोना संसर्ग आता 2 लाख 75 हजार 003 पर्यंत वाढला आहे. त्यापैकी 1 लाख 67 हजार 795 रुग्ण बरे झाले असून 74 हजार 412 रुग्ण सक्रिय आहेत.

भारतात बुधवारी 479 कोरोना बळी

भारतात गुरुवारी 479 कोरोनाबाधित मृत्यूंची नोंद झाली. इराणमध्ये 221, कोलंबियात 187,  पेरूमध्ये 181, रशियात 176, दक्षिण अफ्रिकेत 118, चिलीमध्ये 109 तर इराकमध्ये 103 कोरोना बळी गेले. यूकेमध्ये 85, पाकिस्तानात 61, इंडोनेशियात 58 तर इजिप्तमध्ये 53 कोरोना मृत्यू नोंदविले गेले.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 32,19,999 (+61,067), मृत 1,35,822 (+960)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 17,59,103 (+42,907), मृत 69,254 (+1,199)
  3. भारत – कोरोनाबाधित 7,94,842 (+25,790) , मृत 21,623 (+479)
  4. रशिया – कोरोनाबाधित 7,07,301 (+6,509), मृत 10,843 (+176)
  5. पेरू – कोरोनाबाधित 3,16,448 (+3,537), मृत 11,314 (+181)
  6. चिली – कोरोनाबाधित 3,06,216 (+3,133), मृत 6,682 (+109)
  7. स्पेन –  कोरोनाबाधित 3,00,136 (+543), मृत 28,401 (+5)
  8. यू. के. – कोरोनाबाधित 2,87,621 (+642), मृत 44,602 (+85)
  9. मेक्सिको – कोरोनाबाधित 2,75,003 (+6,995), मृत 32,796 (+782)
  10. इराण – कोरोनाबाधित 2,50,458 (+2,079), मृत 12,305 (+221)
  11. इटली – कोरोनाबाधित 2,42,363 (+214), मृत 34,926 (+12)
  12. पाकिस्तान – कोरोनाबाधित 2,40,848 (+3,359), मृत 4,983 (+61)
  13. दक्षिण अफ्रिका – कोरोनाबाधित 2,38,339 (+13,674), मृत 3,720 (+118)
  14. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 2,23,327 (+3,183), मृत 2,100 (+41)
  15. टर्की – कोरोनाबाधित 2,09,962 (+1,024) मृत 5,300 (+18)
  16. जर्मनी – कोरोनाबाधित 1,99,198 (+433), मृत 9,125 (+10)
  17. बांगलादेशकोरोनाबाधित 1,75,494 (+3,360), मृत 2,238 (+41)
  18. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,70,094 (+621), मृत 29,979 (+14)
  19. कोलंबिया – कोरोनाबाधित 1,33,973 (+5,335), मृत 4,714 (+187)
  20. कॅनडा –  कोरोनाबाधित 1,06,805 (+371), मृत 8,749 (+12)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.