Corona World Update: पाऊण कोटी कोरोनाबाधितांपैकी 38 लाख कोरोनामुक्त तर 33 लाख सक्रिय रुग्ण

Corona World Update: 38 lakh corona free and 33 lakh active patients out of 75 lakh Corona Positive patients

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा पाऊण कोटीच्या पुढे जाऊन पोहचला असून त्यापैकी 38 लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जगातील कोरोनामुक्तांची टक्केवारी आता 50 टक्क्यांहून अधिक म्हणजे 50.59 टक्के झाली आहे.  आता जगात सुमारे 33 लाख सक्रिय कोरोनाबाधित उरले आहेत. कोरोनाबाधितांचे आणि मृतांचे आकडे वाढत असले तरी जगातील मृतांची एकूण टक्केवारी 5.58 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 43.83 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, ही दिलासा देणारी बाब आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) एका दिवसात तब्बल 1 लाख 36 हजार 757 नव्या रुग्णांची भर पडली, त्याबरोबर 1 लाख 05 हजार 127 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. नव्या रुग्णांची संख्या ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 75 लाख 89 हजार 101 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 4 लाख 23 हजार 692 (5.58 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 38 लाख 39 हजार 399 (50.59 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 33 लाख 26 हजार 010 (43.83 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 32 लाख 72 हजार 108  (98 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 53 हजार 902 (2 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

5 जून – नवे रुग्ण 1 लाख 30 हजार 529,  कोरोनामुक्त 89 हजार 947, मृतांची संख्या 4 हजार 906

6 जून – नवे रुग्ण 1 लाख 26 हजार 715,  कोरोनामुक्त 75 हजार 764, मृतांची संख्या 4 हजार 177

7 जून – नवे रुग्ण 1 लाख 13 हजार 417,  कोरोनामुक्त 48 हजार 619, मृतांची संख्या 3 हजार 385

8 जून – नवे रुग्ण 1 लाख 07 हजार 270,  कोरोनामुक्त 75 हजार 280, मृतांची संख्या 3 हजार 157

9 जून – नवे रुग्ण 1 लाख 21 हजार 071,  कोरोनामुक्त 66 हजार 534, मृतांची संख्या 4 हजार 732

10 जून – नवे रुग्ण 1 लाख 34 हजार 705,  कोरोनामुक्त 1 लाख 31 हजार 298, मृतांची संख्या 5 हजार 165

11 जून – नवे रुग्ण 1 लाख 36 हजार 757,  कोरोनामुक्त 1 लाख 05 हजार 127, मृतांची संख्या 4 हजार 951

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे., 

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 20,89,701 (+23,300), मृत 116,034 (+904)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 805,649 (+30,465), मृत 41,058 (+1,261)
  3. रशिया – कोरोनाबाधित 502,436 (+8,779), मृत 6,532 (+174)
  4. भारत – कोरोनाबाधित 298,283 (+11,128) , मृत 8,501 (+394)
  5. यू. के. – कोरोनाबाधित 291,409 (+1,266), मृत 41,279 (+151)
  6. स्पेन – कोरोनाबाधित 289,787 (+427), मृत 27,136 (+0)
  7. इटली – कोरोनाबाधित 2,36,142 (+379), मृत 34,167 (+53)
  8. पेरू –  कोरोनाबाधित 214,788 (+5,965) , मृत 6,109 (+206)
  9. जर्मनी – कोरोनाबाधित 186,795 (+285), मृत 8,851 (+7)
  10. इराण – कोरोनाबाधित 180,156 (+2,218), मृत 8,584 (+78)
  11. टर्की – कोरोनाबाधित 174,023 (+987), मृत 4,763 (+17)
  12. फ्रान्स – कोरोनाबाधित 155,561 (+425), मृत 29,346 (+27)
  13. चिली – कोरोनाबाधित 154,092 (+5,596), मृत 2,648 (+173)
  14. मेक्सिको – कोरोनाबाधित 1,24,301 (+4,883), मृत 15,357 (+708)
  15. पाकिस्तान – कोरोनाबाधित 1,19,536 (+5,834), मृत 2,356 (+101)
  16. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 1,16,021  (+3,733) मृत 857 (+38)
  17. कॅनडा –  कोरोनाबाधित 97,530 (+405), मृत 7,994 (+34)
  18. चीन – कोरोनाबाधित 83,057 (+11), मृत 4,634 (0)
  19. बांगलादेशकोरोनाबाधित 78,052 (+3,187), मृत 1,049 (+37)
  20. कतार – कोरोनाबाधित 75,071 (+1,476), मृत 69 (+3)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.