Corona World Update: दिवसभरात तब्बल 4 लाख 37 हजार 441 नवे रुग्ण, 4.14 कोटींपैकी 3.09 कोटी रुग्ण बरे

जगातील 74.51 टक्के रुग्णांची कोरोनावर मात, मृत्यूदर 2.74 टक्के तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 22.75 टक्के

एमपीसी न्यूज –  जगभरात काल (बुधवारी) तब्बल 4 लाख 37 हजार 441 हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. एका दिवसांत नवीन कोरोना रुग्णांची नोंद होण्याचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4 कोटी 14 लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत 3 कोटी 9 लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

जगातील कोरोनाचा मृत्यूदर सातत्याने थोडा-थोडा कमी होत पावणेतीन टक्क्यांपर्यंत खाली आला असला तरी नवीन कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात भर पडत असल्याने कोरोनामुक्तांचे प्रमाण मात्र आता थोडे घसरताना तर सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण थोडे वाढताना दिसत आहे.

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 4 कोटी 14 लाख  82 हजार 851 झाली असून आतापर्यंत एकूण 11 लाख 36 हजार 310 (2.74 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 3 कोटी 09 लाख 09 हजार 883 (74.51 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 94 लाख 36 हजार 658 (22.75 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 93 लाख 62 हजार 520  (99.21 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 74 हजार 138 (0.79 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.  

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

मागील दोन दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

20 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 83 हजार 202, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 70 हजार 914, मृत्यू 6 हजार 169

21 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 4 लाख 37 हजार 441, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 84 हजार 881, मृत्यू 6 हजार 855

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या, मृतांची संख्या व कोरोनामुक्तांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.