Corona World Update: 80 लाखांपैकी 41 लाख रुग्णांनी जिंकली कोरोनाची लढाई, 4.35 लाख रुग्णांचा मृत्यू

Corona World Update: 41 lakh patients out of 80 lakh win Corona battle, 4.35 lakh patients died. आतापर्यंत 51.40 टक्के कोरोनामुक्त, 5.45 टक्के मृत्यू तर 43.15 टक्के सक्रिय रुग्ण

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 80 लाखांच्या जवळपास पोहचला असला तरी त्यापैकी 41 लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जगातील कोरोनामुक्तांची टक्केवारी आणखी वाढून 51.40 टक्के झाली आहे.  आता जगात सुमारे 34.45 लाख सक्रिय कोरोनाबाधित उरले आहेत. कोरोनाबाधितांचे आणि मृतांचे आकडे वाढत असले तरी जगातील मृतांची एकूण टक्केवारी 5.45 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 43.14 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, ही दिलासा देणारी बाब आहे. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 79 लाख 84 हजार 432 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 4 लाख 35 हजार 177 (5.45 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 41 लाख 04 हजार 373 (51.40 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 34 लाख 44 हजार 882 (43.15 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 33 लाख 90 हजार 760 (98 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 54 हजार 122 (2 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

8 जून – नवे रुग्ण 1 लाख 07 हजार 270,  कोरोनामुक्त 75 हजार 280, मृतांची संख्या 3 हजार 157

9 जून – नवे रुग्ण 1 लाख 21 हजार 071,  कोरोनामुक्त 66 हजार 534, मृतांची संख्या 4 हजार 732

10 जून – नवे रुग्ण 1 लाख 34 हजार 705,  कोरोनामुक्त 1 लाख 31 हजार 298, मृतांची संख्या 5 हजार 165

11 जून – नवे रुग्ण 1 लाख 36 हजार 757,  कोरोनामुक्त 1 लाख 05 हजार 127, मृतांची संख्या 4 हजार 951

12 जून – नवे रुग्ण 1 लाख 40 हजार 917,  कोरोनामुक्त 86 हजार 241, मृतांची संख्या 4 हजार 603

13 जून – नवे रुग्ण 1 लाख 33 हजार 292,  कोरोनामुक्त 1 लाख 05 हजार 371, मृतांची संख्या 4 हजार 229

14 जून – नवे रुग्ण 1 लाख 23 हजार 783,  कोरोनामुक्त 71 हजार 423, मृतांची संख्या 3 हजार 258

अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या 21 लाखांवर

अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्येत काल (रविवारी) 19,920 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या 21 लाख 62 हजार 144 झाली आहे. रविवारी 326 कोरोनाबाधित मृतांची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 1 लाख 17 हजार 853 वर जाऊन पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 8 लाख 67 हजार 849 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

ब्राझीलमध्ये एका दिवसात 843 कोरोना बळी 

ब्राझीलमध्ये रविवारी 598 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे ब्राझीलमधील कोरोना बळींचा एकूण आकडा 43 हजार 389 जाऊन पोहचला आहे. ब्राझीलमध्ये एकूण 8 लाख 67 हजार 882 जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी 4 लाख 37 हजार 512 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ब्राझीलमधील सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाख 86 हजार 981 आहे.

मेक्सिकोतील कोरोना बळींच्या संख्येबाबत चिंता

मेक्सिकोमध्ये कोरोनाबाधितांच्या बळींची संख्या वाढल्याने देशातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. रविवारी मेक्सिकोत 424 कोरोना बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे त्या देशातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 16 हजार 872 वर जाऊन पोहचला आहे. मेक्सिकोत आतापर्यंत 1 लाख 42 हजार 690 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी 1 लाख 04 हजार 975 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

चीनला मागे टाकून बांगलादेश 18 व्या स्थानावर

कोरोना संसर्गाच्या बाबतीच एकेकाळी जगात पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या चीनला मागे टाकत बांगलादेश 18 व्या स्थानावर पोहचला आहे. चीन आता 19 व्या स्थानावर आहे. बांगलादेशमधील कोरोनाबाधितांची संख्या आता 87,520 झाली असून कोरोनाबाधित मृतांचा आकडा 1,171 पर्यंत पोहचला आहे. 

भारतात रविवारी 321 कोरोना बळी

भारतात रविवारी एका दिवसात 321 कोरोना बळींची नोंद झाली आहे. चिलीमध्ये 222, पेरूमध्ये 190, रशियात 119 तर इराणमध्ये 107 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. इजिप्तमध्ये 91, पाकिस्तानमध्ये 81, कोलंबिया 75, इराकमध्ये 58 तर दक्षिण अफ्रिकेत 57 कोरोना बळी गेले आहेत.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 21,62,144 (19,920), मृत 1,17,853 (+326)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 8,67,882 (+17,086), मृत 43,389 (+598)
  3. रशिया – कोरोनाबाधित 5,28,964 (+8,835), मृत 6,948 (+119)
  4. भारत – कोरोनाबाधित 3,33,008 (+11,382) , मृत 9,520 (+321)
  5. यू. के. – कोरोनाबाधित 2,95,889 (+1,514), मृत 41,698 (+36)
  6. स्पेन – कोरोनाबाधित 2,91,008 (+323), मृत 27,136 (+0)
  7. इटली – कोरोनाबाधित 2,36,989 (+338), मृत 34,345 (+44)
  8. पेरू –  कोरोनाबाधित 2,29,736 (+4,604) , मृत 6,688 (+190)
  9. जर्मनी – कोरोनाबाधित 1,87,671 (+248), मृत 8,870 (+3)
  10. इराण – कोरोनाबाधित 1,87,427 (+2,472), मृत 8,837 (+107)
  11. टर्की – कोरोनाबाधित 1,78,239 (+1,562), मृत 4,807 (+15)
  12. चिली – कोरोनाबाधित 1,74,293 (+6,938), मृत 3,323 (+222)
  13. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,57,220 (+407), मृत 29,407 (+9)
  14. मेक्सिको – कोरोनाबाधित 1,42,690 (+3,494), मृत 16,872 (+424)
  15. पाकिस्तान – कोरोनाबाधित 1,39,230 (+6,825), मृत 2,632 (+81)
  16. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 1,27,541 (+4,233) मृत 972 (+40)
  17. कॅनडा –  कोरोनाबाधित 98,787 (+377), मृत 8,146 (+39)
  18. बांगलादेशकोरोनाबाधित 87,520 (+3,141), मृत 1,171 (+32)
  19. चीन – कोरोनाबाधित 83,132 (+57), मृत 4,634 (0)
  20. कतार – कोरोनाबाधित 79,602 (+1,186), मृत 73 (+3)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.