Corona World Update: दहा लाख लोकसंख्येमागे भारतात 63 कोरोना बळी तर अमेरिकेत 615 बळी

भारतात 15,938 लोकसंख्येमागे कोरोनाचा एक बळी, अमेरिकेत 1,626 लोकांमागे कोरोनाचा एक बळी

MPC News (Vivek Inamdar) – जगातील कोरोनाबाधितांची आणि कोरोना बळींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. भारतातील कोरोना बळींच्या प्रमाणात या महिन्यात लक्षणीय वाढ झाली असली तरी जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतातील जीवितहानी कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. दहा लाख लोकसंख्येमागे पेरूमध्ये 949, अमेरिकेत 615, ब्राझीलमध्ये 641 तर भारतात 63 कोरोना बळी गेले आहेत. भारतातील मोठी लोकसंख्या आणि तुलनेत चाचण्यांचे कमी प्रमाण यामुळे बळींचे प्रमाण तुलनात्मक दृष्ट्या कमी दिसून येत आहे. भारतात 15,938 लोकसंख्येमागे कोरोनाचा एक बळी तर अमेरिकेत 1,626 लोकांमागे कोरोनाचा एक बळी गेल्याचे पाहायला मिळत आहे.

अमेरिकेत तब्बल 9 कोटी 73 लाख 10 हजार 312 चाचण्या झाल्या असून त्यातून 69 लाख 67 हजार 403 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असून 2 लाख 03 हजार 824 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दहा लाख लोकसंख्येमागे हे प्रमाण 615 इतके आहे. अमेरिकेतील कोरोना मृत्यूदर 2.93 टक्के आहे.

भारतात आतापर्यंत 6 कोटी 24 लाख 54 हजार 254 चाचण्या झाल्या असून त्यातून 53 लाख 98 हजार 230 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असून आतापर्यंत 86 हजार 774 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दहा लाख लोकसंख्येमागे हे प्रमाण 63 इतके आहे. भारतातील कोरोना मृत्यूदर 1.61 टक्के आहे.

ब्राझीलमध्ये आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 11 हजार 116 चाचण्या असून त्यातून 45 लाख 28 हजार 347 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असून आतापर्यंत 1 लाख 36 हजार 565 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दहा लाख लोकसंख्येमागे हे प्रमाण 641 इतके आहे. ब्राझीलमधील कोरोना मृत्यूदर 3.02 टक्के आहे.

रशियामध्ये आतापर्यंत 4 कोटी 24 लाख चाचण्या झाल्या असून त्यातून 10 लाख 97 हजार 251 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 19 हजार 339 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दहा लाख लोकसंख्येमागे हे प्रमाण 133 इतके आहे. रशियामधील कोरोना मृत्यूदर 1.76 टक्के आहे.

पेरूमध्ये आतापर्यंत 36 लाख 67 हजार 968 चाचण्या झाल्या असून त्यातून 7 लाख 62 हजार 865 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असून आतापर्यंत 31 हजार 369 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दहा लाख लोकसंख्येमागे हे प्रमाण 949 इतके आहे. ब्राझीलमधील कोरोना मृत्यूदर 4.11 टक्के आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशांच्या तुलनेत भारतातील कोरोना मृत्यूदर व दहा लाख लोकसंख्येमागील कोरोना मृत्यूंचे प्रमाण खूप कमी असून कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या देखील भारतात सर्वाधिक आहे, ही बाब आपल्या दृष्टीने काहीशी दिलासादायक म्हणावी लागेल.

अमेरिकेत दहा लाख लोकसंख्येमागे 2 लाख 93 हजार 607 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. रशियात हे प्रमाण 2 लाख 90 हजार 514, ब्राझीलमध्ये हे प्रमाण 70 हजार 510, भारतात हे प्रमाण 45 हजार 159 तर पेरूमध्ये हेच प्रमाण 1 लाख 10 हजार 910 आहे. म्हणजेच भारतातील चाचण्यांचे प्रमाण हे अन्य प्रमुख कोरोनाबाधित देशांच्या तुलनेत अजूनही खूप कमी आहे. 

जगातील तीन कोटींपैकी सव्वादोन कोटी रुग्णांची कोरोनावर मात

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 3 कोटी 09 लाख 84 हजार 437 झाली असून आतापर्यंत एकूण 9 लाख 61 हजार 400 (3.10 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 2 कोटी 25 लाख 83 हजार 470 (72.89 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 74 लाख 39 हजार 567 (24.01 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 73 लाख 78 हजार 181 (99.17 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 61 हजार 386 (0.83 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.  

मागील सहा दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

14 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 2 लाख 42 हजार 856, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 48 हजार 690, मृत्यू 4 हजार 379

15 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 2 लाख 78 हजार 856 , नवीन कोरोनामुक्त 2 लाख 61 हजार 765, मृत्यू 6 हजार 005

16 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 08 हजार 226, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 62 हजार 620, मृत्यू 6 हजार 229

17 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 09 हजार 054, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 31 हजार 924 , मृत्यू 5 हजार 484

18 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 15 हजार 130, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 98 हजार 506 , मृत्यू 5 हजार 465

19 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 2 लाख 91 हजार 222, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 48 हजार 483 , मृत्यू 5 हजार 142

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या, मृतांची संख्या व कोरोनामुक्तांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.