Corona World Update: जगातील पाऊण कोटी रुग्णांनी जिंकली कोरोनाची लढाई!

Corona World Update: 7.5 Millions of patients around the world win the battle of Corona! जगात 58.16 टक्के रुग्ण कोरोनामुक्त, मृत्यूदर 4.38 टक्के तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 37.45 टक्क्यांपर्यंत खाली

एमपीसी न्यूज – जगभरात काल (रविवारी) 1 लाख 94 हजार 677 नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे जगातील एकूण कोरोना संसर्ग 1.30 कोटींच्या पुढे वाढला आहे. त्यातील पाऊण कोटींपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. जगातील कोरोनामुक्तांचे प्रमाण आता 58.16 टक्के झाले आहे. काल (रविवारी) एका दिवसात 1 लाख 02 हजार 610 रुग्ण बरे झाले. कोरोनाबाधित मृतांचे प्रमाण आता 4.38 टक्क्यांपर्यंत कमी आले आहे, ही थोडा दिलासा देणारी बाब मानण्यात येत आहे. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 1 कोटी 30 लाख 35 हजार 942 झाली असून आतापर्यंत एकूण 5 लाख 71 हजार 571 (4.38 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 75 लाख 82 हजार 035 (58.16 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 48 लाख 82 हजार 336 (37.45 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 48 लाख 23 हजार 407 (98.79 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 58 हजार 929 (1.21 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

6 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 71 हजार 508, कोरोनामुक्त 1 लाख 06 हजार 240 , मृतांची संख्या 3 हजार 583

7 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 08 हजार 087, कोरोनामुक्त 2 लाख 08 हजार 243, मृतांची संख्या 5 हजार 515

8 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 13 हजार 280, कोरोनामुक्त 1 लाख 80 हजार 299, मृतांची संख्या 5 हजार 518

9 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 22 हजार 825, कोरोनामुक्त 1 लाख 56 हजार 623, मृतांची संख्या 5 हजार 404

10 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 36 हजार 918,  कोरोनामुक्त 1 लाख 47 हजार 743, मृतांची संख्या 5 हजार 416

11 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 14 हजार 786,  कोरोनामुक्त 1 लाख 45 हजार 522, मृतांची संख्या 5 हजार 015

12 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 94 हजार 677,  कोरोनामुक्त 1 लाख 02 हजार 610, मृतांची संख्या 3 हजार 956

अमेरिकेत 15 लाखांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

अमेरिकेत रविवारी 58 हजार 349 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 34 लाख 13 हजार 995 झाली आहे. रविवारी अमेरिकेत 380 कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना बळींचा आकडा 1 लाख 37 हजार 782 पर्यंत वाढला आहे. अमेरिकेत 15 लाख 17 हजार 084 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजून अमेरिकेत 17 लाख 59 हजार 129 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

ब्राझीलमध्ये 72 हजारांहून अधिक कोरोना बळी

ब्राझीलमध्ये रविवारी 659 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे ब्राझीलमधील कोरोना बळींचा आकडा 72 हजार 151 वर पोहचला आहे. ब्राझीलमधील कोरोनाबाधितांची संख्या 18 लाख 66 हजार 176 झाली असून त्यापैकी 12 लाख 13 हजार 512 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आता ब्राझीलमध्ये 5 लाख 80 हजार 513 सक्रिय कोरोना रुग्ण उरले आहेत.

इंग्लंडला मागे टाकत मेक्सिको आठव्या क्रमांकावर

कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत इंग्लंडला मागे टाकत मेक्सिको आठव्या स्थानावर पोहचला आहे. इंग्लंड आता नवव्या स्थानावर गेला आहे.  मेक्सिकोत रविवारी 539 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे मेक्सिकोतील कोरोना बळींचा आकडा 34 हजार 730 झाला आहे. मेक्सिकोतील कोरोना संसर्ग आता 2 लाख 95 हजार 268 पर्यंत वाढला आहे. त्यापैकी 1 लाख 80 हजार 852 रुग्ण बरे झाले असून 79 हजार 686 रुग्ण सक्रिय आहेत.

दक्षिण अफ्रिका ‘टॉप 10’मध्ये

दक्षिण अफ्रिकेने कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत ‘टॉप 10’ देशांमध्ये प्रवेश केला आहे. दहाव्या स्थानावर असलेल्या इराणला मागे टाकत दक्षिण अफ्रिका दहाव्या स्थानावर पोहचला आहे. इराण आता 11 व्या स्थानावर आहे.

भारतात रविवारी 500 कोरोना बळी

भारतात रविवारी 500 कोरोनाबाधित मृत्यूंची नोंद झाली. इराणमध्ये 194, कोलंबियात व पेरूमध्ये प्रत्येकी 18, रशियात 130, दक्षिण अफ्रिकेत 108, कोरोना बळी गेले. चिलीमध्ये 98, इराकमध्ये 95, इजिप्तमध्ये 89, पाकिस्तानात 74, इंडोनेशियात 71 तर बोलिविया व येमेनमध्ये प्रत्येकी 52 कोरोना मृत्यू नोंदविले गेले.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 34,13,995 (+58,349), मृत 1,37,782 (+380)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 18,66,176 (+25,364), मृत 72,151 (+659)
  3. भारत – कोरोनाबाधित 8,79,466 (+29,108) , मृत 23,187 (+500)
  4. रशिया – कोरोनाबाधित 7,27,162 (+6,615), मृत 11,335 (+130)
  5. पेरू – कोरोनाबाधित 3,26,326 (+3,616), मृत 11,870 (+188)
  6. चिली – कोरोनाबाधित 3,15,041 (+3,012), मृत 6,979 (+98)
  7. स्पेन –  कोरोनाबाधित 3,00,988 (+0), मृत 28,403 (+0)
  8. मेक्सिको – कोरोनाबाधित 2,95,268 (+6,094), मृत 34,730 (+539)
  9. यू. के. – कोरोनाबाधित 2,89,603 (+650), मृत 44,819 (+21)
  10. दक्षिण अफ्रिका – कोरोनाबाधित 2,76,242 (+12,058), मृत 4,079 (+108)
  11. इराणकोरोनाबाधित 2,57,303 (+2,186), मृत 12,829 (+194)
  12. पाकिस्तान – कोरोनाबाधित 2,48,872 (+2,521), मृत 5,197 (+74)
  13. इटली – कोरोनाबाधित 2,43,061 (+234), मृत 34,954 (+9)
  14. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 2,32,259 (+2,779), मृत 2,223 (+42)
  15. टर्की – कोरोनाबाधित 2,12,993 (+1,012) मृत 5,363 (+19)
  16. जर्मनी – कोरोनाबाधित 1,99,950 (+138), मृत 9,134 (+0)
  17. बांगलादेशकोरोनाबाधित 1,83,795 (+2,666), मृत 2,352 (+47)
  18. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,70,752 (+0), मृत 30,004 (+0)
  19. कोलंबिया – कोरोनाबाधित 1,50,445 (+5,083), मृत 5,307 (+188)
  20. कॅनडा –  कोरोनाबाधित 1,07,590 (+243), मृत 8,783 (+10)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.